दोन लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकºयांना लवकरच गोड बातमी- प्राजक्त तनपुरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 04:03 PM2020-02-29T16:03:27+5:302020-02-29T16:03:35+5:30
राहुरी : कर्ज माफीसाठी कुणालाही हेलपाटे मारावे लागले नाहीत. कर्ज माफीनंतर दोन लाख रूपयांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकºयांनाही लवकरच शासन गोड बातमी देणार आहे़ विजेचा प्रश्न गेल्या शासनाच्या कालावधीत गंभीर बनला होता़ यापुढील काळात विजेचे कनेक्शन देतांना दिरंगाई होणार नाही, अशी ग्वाही नगरविकास व उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले़
राहुरी : कर्ज माफीसाठी कुणालाही हेलपाटे मारावे लागले नाहीत. कर्ज माफीनंतर दोन लाख रूपयांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकºयांनाही लवकरच शासन गोड बातमी देणार आहे़ विजेचा प्रश्न गेल्या शासनाच्या कालावधीत गंभीर बनला होता़ यापुढील काळात विजेचे कनेक्शन देतांना दिरंगाई होणार नाही, अशी ग्वाही नगरविकास व उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले़
महाराजस्व अभियान अंतर्गत राहुरी तहसील कचेरीच्या प्रांगणात झालेल्या जनता दरबारमध्ये हजारो लोकांनी हजेरी लावली़ रांगेत उभे राहून नागरीकांनी टोकन घेतले़ त्यानंतर नागरिकांनी मंत्री तनपुरे यांच्यासमोर अडचणींचा पाढा वाचला़ यापुढील काळात नागरीकांची कामे करण्यासाठी पुढाºयांकडे येण्याची वेळ येऊ नये इतके चांगले काम करण्याचे निर्देश मंत्री तनपुरे यांनी दिले़
नियमीत कर्ज भरणाºयांना राज्य शासन सुखद बातमी देणार असल्याचे मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगताच उपस्थितांनी टाळयाच्या गजरात स्वागत केले़ कर्जमाफी प्रकरणात सुटसुटीत पणा आला आहे़ महिला किंवा दिव्यांपंगांना त्रास झाला नाही़ गेल्या सरकारच्या काळात अनेक महिने कर्जमाफीचा घोळ सुरू होता़ ब्राम्हणी गावाची कर्जमाफी आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर बँक खात्यात रक्कम जमा झाली.यावर्षी पाण्याची परिस्थिती समाधानकारण असून शेतकºयांची गैरसोय होणार नाही,यादृष्टीकोनातून वीजेचे धोरण आखण्यात येईल. तहसीलदार फसिददीन शेख,धीरज गायकवाडे,रजिस्टार नागरगोजे,सभापती बेबीताई सोडनर,नगराध्यक्षा राधाताई साळवे बाबासाहेब भिटे,मच्छिंद्र सोनवणे,धनराज गाडे,भास्कर गाडे,निर्मलाताई मालपाणी,संभाजी पालवे,धीरज पानसंबळ,बाळासाहेब आढाव आदी उपस्थित होते़ गणेश तळेकर यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले़
---
जेम्बो जनता दरबाऱ़़़
राहुरीच्या इतिहासात अनेक वेळा आमदार खासदार यांनी जनता दरबाराचे आयोजन केले होते़नव्याने मंत्रीपदाची वर्णी लागल्याने अनेकांना उत्सुकता होती़जनतेचे प्रश्न सुटतात की नाही याबाबत उपस्थितांमध्ये उत्सुकता होती़वीज,पाणी पुरवठा,आरोग्यासह नागरीकांनी मंत्र्यांसमोर ग-हाणे मांडले़मंडपात जागा न पुरल्याने नागरीक उन्हात रांगेत उभे राहुन टोकण घेत होतेक़ाही उणीवा राहील्यास भविष्यकाळात त्या दुर केल्या जातील असेही मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले़