कौठा येथील सात उमेदवारांची चिन्ह बदलली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:17 AM2021-01-09T04:17:32+5:302021-01-09T04:17:32+5:30

श्रीगोंदा : तालुक्यातील कौठा ग्रामपंचायत निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी धोंडीराम मुळे यांनी २२ पैकी ११ उमेदवारांना छत्री हे निवडणूक ...

The symbol of seven candidates from Kautha changed | कौठा येथील सात उमेदवारांची चिन्ह बदलली

कौठा येथील सात उमेदवारांची चिन्ह बदलली

श्रीगोंदा : तालुक्यातील कौठा ग्रामपंचायत निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी धोंडीराम मुळे यांनी २२ पैकी ११ उमेदवारांना छत्री हे निवडणूक चिन्ह दिले. ही चूक लक्षात येताच निवडणूक आयोगाने सात उमेदवारांना नवीन निवडणूक चिन्ह दिले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरोधात शाहूराजे शिपलकर यांनी न्यायालयात धाव घेण्याचा इशारा दिला आहे.

कौठा ग्रामपंचायत निवडणूक चिन्ह वाटप करताना विरोधी पॅनलच्या एका नेत्याने एक शाहूराजे शिपलकर यांच्या ११ उमेदवारांना एकच निवडणूक चिन्ह देण्यास हरकत नाही, असे पत्र दिले. या मोहजाळ्यात निवडणूक निर्णय अधिकारी मुळे फसले आणि ११ उमेदवारांना एकच चिन्ह दिले. ही चूक लक्षात येताच वरीष्ठ अधिकाऱ्यांचा सल्ला घेतला. निवडणूक आयोगाची वेबसाईट ओपन केली आणि ११ पैकी ज्ञानेश्वर शिपलकर, आशा शिपलकर, बापू मोरे, चंद्रकला खोरे, निर्मला बागल, गीता घमडे, सविता सुपेकर यांना नवीन दोन निवडणूक चिन्ह दिले.

मात्र या विरोधात काळ भैरवनाथ पॅनलच्या नेत्यांनी न्यायालयात जाण्याचा पवित्रा घेतला आहे.

---

निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यावर चिन्ह वाटप करताना काही मंडळींनी दबाव आणला. त्यामुळे एकच निवडणूक चिन्ह दिले. मात्र निवडणूक आयोगाची वेबसाईट ओपन करून सात उमेदवारांना त्यांनी उमेदवारी अर्जात केलेल्या मागणीनुसार नवीन निवडणूक चिन्ह दिले आहे.

-प्रदीप पवार,

तहसीलदार, श्रीगोंदा.

---

निवडणूक निर्णय अधिकारी यांनी चिन्ह वाटप करताना सर्व उमेदवारांना एकसारखे निकष न लावता एकच चिन्ह अकरा उमेदवारांना दिले. हे चिन्ह तीन दिवसांनी सात उमेदवारांना बदलून दिले. ही आमची फसवणूक आहे. या विरोधात न्यायालयात दाद मागणार आहे.

-शाहूराजे शिपलकर,

गटनेते, काळ भैरवनाथ पॅनल, कौठा

Web Title: The symbol of seven candidates from Kautha changed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.