राहाता येथे मोदी सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा
By | Published: December 8, 2020 04:18 AM2020-12-08T04:18:18+5:302020-12-08T04:18:18+5:30
राहाता : राहाता येथे काँग्रेसच्या वतीने मोदी सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून नगर-मनमाड महामार्गावर शिवाजी चौकात अंत्यसंस्कार करण्यात आले. केंद्र ...
राहाता : राहाता येथे काँग्रेसच्या वतीने मोदी सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून नगर-मनमाड महामार्गावर शिवाजी चौकात अंत्यसंस्कार करण्यात आले.
केंद्र सरकारने केलेले शेतकरी व कामगार विरोधी काळे कायदे रद्द करा, बाजार समितीचे अस्तित्व जिवंत ठेवा, जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याला न्याय द्या, अशा घोषणा देत राहाता येथील हुतात्मा चौकातून केंद्र सरकारची प्रतीकात्मक अंतयात्रा काढण्यात आली. या आंदोलनात राहाता तालुक्यातील काँग्रेस, युवक काँग्रेसने सहभाग घेतला. यावेळी सुरेश थोरात, इंद्रनाथ थोरात, श्रीकांत मापारी, राजेंद्र निर्मळ, सचिन गाडेकर, अमृत गायके, सचिन चौगुले, शाहरुख बागवान, प्रसाद शेळके, मामा पगारे, संजय पगारे, मदन मोकाटे, सुनील जाधव, देवराम धनवटे, रतन अरणे, विनायक जांभुळकर, राजेंद्र वर्पे, सागर कदम आदी उपस्थित होते.
..............
महामार्गावर केले प्रतीकात्मक अंत्यसंस्कार
केंद्र सरकारने केलेले शेतकरी व कामगारविरोधी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसने मोदी सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून महामार्गावरच सरकारच्या तिरडीचे प्रतीकात्मक अंत्यसंस्कार केले. यावेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
.............
०७ राहाता आंदोलन