चीनच्या राष्ट्राध्यक्षांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला संगमनेरात फाशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 06:28 PM2020-06-19T18:28:32+5:302020-06-19T18:29:25+5:30
संगमनेर : भारत आणि चीनच्या सीमेवर चीनने केलेल्या हल्ल्यात भारतीय जवान शहीद झाले. त्या शहिदांना श्रध्दांजली वाहत संगमनेरातील माहिती प्रवाह ट्रस्टच्यावतीने चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चप्पलांचा हार घालत बसस्थानक चौकात फाशी देण्यात आली.

चीनला सडेतोड उत्तर देण्यासाठी कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. केंद्र सरकारने जशास तसे उत्तर द्यावे. चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकला पाहिजे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
माहिती प्रवाह ट्रस्टचे समन्वयक मोहसीन मणियार व त्यांचे सहकारी शाहनवाज बेगमपुरे, जमीर शेख, मुदस्सर शेख, ईशाद शेख, शाहनवाज बागवान, आवेज पठाण यांनी शी जिनपिंग यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चप्पलांचा हार घातला. त्यानंतर शहरातून फेरी काढत बसस्थानक चौकात प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी देण्यात आली.
चीनच्या वस्तू नागरिकांनी खरेदी करू नये यासाठी जनजागृती करणार असल्याचे ट्रस्टचे समन्वयक मणियार यांनी सांगितले.