शिवरायांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या श्रीपाद छिंदमवर तडीपारीची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2018 09:25 AM2018-11-29T09:25:10+5:302018-11-29T10:48:51+5:30

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या अहमदनगरचा माजी उप-महापौर श्रीपाद छिंदमवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. प्रांत अधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी ही कारवाई केली आहे.  

Tadipaar Action taken against Shripad Chhindam, who has made objectionable statements about Shivaji Maharaj | शिवरायांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या श्रीपाद छिंदमवर तडीपारीची कारवाई

शिवरायांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या श्रीपाद छिंदमवर तडीपारीची कारवाई

ठळक मुद्देश्रीपाद छिंदमनं शिवरायांबाबत केले होतं आक्षेपार्ह विधानभाजपानं घेतला छिंदमचा उप-महापौरपदाचा राजीनामाप्रांत अधिकाऱ्याकडून छिंदमविरोधात तडीपारीची कारवाई

अहमदनगर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या अहमदनगरचा माजी उप-महापौर श्रीपाद छिंदमविरोधात तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. प्रांत अधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी ही कारवाई केली आहे.  

छिंदम याने 16  फेब्रुवारी 2018 रोजी महापालिकेच्या एका कर्मचाऱ्याशी मोबाइलवर बोलताना शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्याची क्लीप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. अनेक ठिकाणी त्याच्याविरुद्ध आंदोलनं करण्यात आली. त्यानंतर भाजपाने छिंदमची पक्षातून हकालपट्टी करत त्याच्याकडून उपमहापौरपदाचाही राजीनामाही घेतला होता.

छिंदमने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह व्यक्तव्य केल्याने नगर शहरासह जिल्ह्यात प्रचंड जनक्षोभ उसळला होता. याप्रकरणी छिंदमला अटकदेखील करण्यात आली होती. छिंदम याच्यावर सरकारी कामात अडथळा व धार्मिक भावना दुखवल्याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले होते.  

(माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम निवडणुकीच्या मैदानात)

महापालिका निवडणुकीत प्रभाग ९ मध्ये उभा असलेला अपक्ष उमेदवार श्रीपाद छिंदमला शहरातून हद्दपार करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने बुधवारी (28 नोव्हेंबर) संध्याकाळी दिले. आतापर्यंत ३०० हून अधिक जणांना शहरातून हद्दपार करण्यात आले आहे. काहींना अटी-शर्तींवर शहरात राहण्यास परवानगी देण्यात आली आहे. 

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत बेताल वक्तव्य करणारा छिंदम याच्याही तडीपारीचा प्रस्ताव पोलीस प्रशासनाने ठेवला होता. त्यावर सुनावणी झाल्यानंतर बुधवारी (28 नोव्हेंबर) संध्याकाळी छिंदमच्या तडीपारीचे आदेश देण्यात आले. छिंदम प्रभाग ९ मधून अपक्ष उमेदवारी करत आहे. या कारवाईमुळे छिंदमला प्रचार करणेही अवघड झाले आहे. छिंदम आता निवडणुकीला कसा सामोरे जाणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. 

 

Web Title: Tadipaar Action taken against Shripad Chhindam, who has made objectionable statements about Shivaji Maharaj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.