धो धो पावसात साकळाईसाठी मुंबईत शेतक-यांचा टाहो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2019 12:17 PM2019-06-26T12:17:36+5:302019-06-26T12:18:08+5:30
नगर आणि श्रीगोंदा तालुक्यांतील 35 गावांतील शेतक-यांचा जीवनमरणाचा प्रश्न असलेल्या साकळाई उपसा सिंचन योजनेच्या मंजुरीसाठी
श्रीगोंदा : नगर आणि श्रीगोंदा तालुक्यांतील 35 गावांतील शेतक-यांचा जीवनमरणाचा प्रश्न असलेल्या साकळाई उपसा सिंचन योजनेच्या मंजुरीसाठी शेतक-यांनी मुंबईतील आझाद मैदानावर भर पावसात धरणे आंदोलन करून टाहो फोडला.
यावेळी आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांनी वाळकी येथील सभेत केलेल्या घोषणेची आठवण मुख्यमंत्र्यांना करून देण्यासाठी घोषणा दिल्या. साकळाई योजनेला मंजुरी मिळाली नाही तर 9 आॅगस्ट पासून आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस, युवक क्रांती दलाचे प्रदेशाध्यक्ष रवी लाटे, प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद परदेशी, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम शेळके, राजेंद्र देशमुख, धनंजय शिंदे, जयसिंग खेंडके, राम वाघ, प्रविण पिंपळे, कारभारी बोरूडे, मनोज मुरकुटे, अशोक बोरूडे, दिनेश घोडके, विकास भूतकर, राम भूतकर, नितीन वाघ, गोवर्धन कार्ले, महेश शिंदे, प्रसाद मदने, अमोल कोहक, निलेश बोरूडे, रोहन गायकवाड, कमलाकर शेटे, संदीप बर्वे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार बच्चू कडू यांची घेतली भेट
आंदोलन संपल्यानंतर शेतक-यांनी आमदार बच्चू कडू यांची वधान भवनात भेट घेतली. 9 आॅगस्टपासून करण्यात येणा-या आंदोलनात मी तुमच्या बरोबर लढणार असल्याचे आमदार कडू यांनी सांगितले.