शीख, पंजाबी समाजाची बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:28 AM2020-12-30T04:28:35+5:302020-12-30T04:28:35+5:30
या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना देण्यात आले. यावेळी हरजीतसिंग वधवा, प्रितपालसिंग धुप्पड, राजू मदान, ...
या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना देण्यात आले. यावेळी हरजीतसिंग वधवा, प्रितपालसिंग धुप्पड, राजू मदान, चमनलाल कुमार, पुनीत भूतानी, राजा नारंग, रामसिंग कथुरिया, किरपाल सिंग, अमरजितसिंग वधवा, हरजिंदर सिंग, सुरेंद्रसिंग चावला, जस्मीत वधवा, सनी वधवा, अजितसिंग वधवा, संदीप आहुजा, ए. सी. कंत्रोड, हरविंदरसिंग नारंग, सरबजितसिंग अरोरा, बलजितसिंग बिलरा, हरवीरसिंग मक्कर, बॉबी सिंग आदी उपस्थित होते.
भारतातील शेतकरी मागील एक महिन्यापासून दिल्ली येथे कडाक्याच्या थंडीत आंदोलन करीत आहे. केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्याच्या विरोधात हे आंदोलन सुरू असून, शेतकरी विरोधी असलेले कृषी कायदे रद्द करण्याची मागणीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनात अनेक आंदोलक शेतकऱ्यांचा जीव गेला आहे. पूर्वी पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी या आंदोलनात उतरले होते. सध्या महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड आणि बिहार मधील शेतकरी आंदोलनात सहभागी होत आहेत. मात्र, समाजमाध्यमांवर शीख, पंजाबी समाजाला बदनाम करण्याचे षडयंत्र रचले गेले आहे. खलिस्तानवादीचा मुद्दा उपस्थित करुन आंदोलक शेतकऱ्यांना खलिस्तानवादीची उपमा दिली जात आहे. त्यामुळे समाज माध्यमांवर शीख, पंजाबी समाजाची बदनामी करणार्या समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणी शीख, पंजाबी समाजाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
----------
फोटो - २९शीख निवेदन
दिल्ली येथे मागील ३२ दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा प्रश्न केंद्र सरकारने तातडीने समन्वयाने सोडवावा, तसेच शेतकरी आंदोलनाच्या मुद्दयावरुन समाज माध्यमांवर शीख, पंजाबी समाजाची बदनामी करणार्या समाजकंटकांवर कारवाई करण्याची मागणीचे निवेदन शहरातील शीख, पंजाबी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना देण्यात आले.