ठोस निर्णय घ्या, अन्यथा जानेवारीत दिल्लीमध्ये आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:21 AM2020-12-31T04:21:10+5:302020-12-31T04:21:10+5:30

अहमदनगर : केंद्र सरकारने चार वर्षे केवळ आश्वासने दिली. आता शेतकऱ्यांच्या पिकांबाबतच्या स्वामीनाथन् आयोगाच्या शिफारशींबाबत केंद्र सरकारने ठोस निर्णय ...

Take concrete decisions, otherwise agitation in Delhi in January | ठोस निर्णय घ्या, अन्यथा जानेवारीत दिल्लीमध्ये आंदोलन

ठोस निर्णय घ्या, अन्यथा जानेवारीत दिल्लीमध्ये आंदोलन

अहमदनगर : केंद्र सरकारने चार वर्षे केवळ आश्वासने दिली. आता शेतकऱ्यांच्या पिकांबाबतच्या स्वामीनाथन् आयोगाच्या शिफारशींबाबत केंद्र सरकारने ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा जानेवारी महिन्यात दिल्लीत आंदोलन करण्यावर ठाम आहे, असा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला आहे. विविध मागण्यांचे निवेदन हजारे यांनी केंद्र सरकारला पाठविले आहे.

शेतकऱ्यांना शेतीमाल उत्पन्नाच्या खर्चावर आधारित भाव मिळत नसल्याने तो आत्महत्या करीत आहे. प्रत्येक राज्यात कृषीमूल्य आयोग आहेत. या कृषीमूल्य आयोगामध्ये राज्यातील सर्व विद्यापीठांचे वेगवेगळ्या पिकांचे शास्त्रज्ञ आहेत. ते संबंधित पिकाचा लागवडीपासून ते बाजारात नेईपर्यंतचा हिशेब काढून केंद्रीय कृषीमूल्य आयोगाकडे पाठवितात. केंद्रीय कृषीमूल्य आयोग हा केंद्र सरकारच्या कृषीमंत्र्यांच्या अखत्यारित असल्यामुळे राज्यातील आलेल्या कृषीमूल्य आयोगाच्या अहवालामध्ये १० टक्क्यांपासून ५० टक्क्यांपर्यंत कारण नसताना कपात केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना खर्चावर आधारित भाव मिळत नाही. स्वामीनाथन् आयोगाच्या शिफारशीनुनार शेतकऱ्यांच्या पिकांना भाव मिळायला हवा. त्याप्रमाणे भाव मिळावा यासाठी हमीभाव जाहीर केला. तसा भाव आम्ही देतो, असे केंद्र सरकार सांगते. मात्र, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना किती पैसे मिळतात ते पाहिले पाहिजे, असे अण्णांनी पत्रात म्हटले आहे. यासाठी २०१७ पासून विविध ठिकाणी चार आंदोलने केली. शासनाने शेतकऱ्यांबाबतच्या मागण्या मान्य करण्यासाठी आश्वासन दिले होते. मात्र, त्यावर काहीच कार्यवाही झाली नाही.

--

चर्चा आता थांबवा

याबाबत नुकतेच विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खा. भागवत कराड यांच्यासह माजी मंत्री गिरीश महाजन यांनीही राळेगण येथे येऊन चर्चा केली. परंतु, आता चर्चा, आश्वासने थांबवा, ठोस निर्णय घ्या, असे हजारे यांनी पत्रात म्हटले आहे. अन्यथा, जानेवारीमध्ये दिल्लीत आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.

Web Title: Take concrete decisions, otherwise agitation in Delhi in January

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.