साथीचे आजार रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:26 AM2021-09-15T04:26:15+5:302021-09-15T04:26:15+5:30
अहमदनगर : शहरासह उपनगरांत डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनियासह इतर साथीच्या आजारांचा वेगाने फैलाव होत असून, साथीचा आजार रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना ...
अहमदनगर : शहरासह उपनगरांत डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनियासह इतर साथीच्या आजारांचा वेगाने फैलाव होत असून, साथीचा आजार रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना सुरू करा, असा आदेश आमदार संग्राम जगताप यांनी महापालिकेच्या आरोग्य विभागाला दिला.
आमदार जगताप यांनी जुन्या महापालिका कार्यालयात मंगळवारी आरोग्य विभागाचा आढावा घेतला. यावेळी आयुक्त शंकर गोरे, उपायुक्त यशवंत डांगे, वैद्यकीय आराेग्य अधिकारी डॉ.सतीष राजूरकर आदी उपस्थित होते. शहरात साथीच्या आजारांचे रुग्ण वाढत आहेत. डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया आजाराने शरीरातील पांढऱ्या पेशी कमी होतात. नागरिक घाबरू जाऊन रुग्णालयात दाखल होत आहेत. उपचारासाठी खर्च येत असल्याने, त्याच्यावर मोठा आर्थिक ताण पडतो. त्यामुळे या साथीच्या आजारावर तातडीने उपाययोजना सुरू कराव्यात, अशी सूचना आमदार जगताप यांनी केली, तसेच त्यांनी कोविड काळात केलेल्या कामाबद्दल आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असले, तरी शहरात मात्र ती संख्या कमी आहे. याचा अर्थ, कोरोना रुग्णसंख्या नियंत्रित करण्यात यश आले आहे. शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर कोरोना लसीकरण सुरू आहे.
.....
रस्त्यांचे पॅचिंग लवकरच
शहरातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली आहे. त्यामुळे खड्डे बुजविण्याचे काम तातडीने हाती घेण्याची सूचना जगताप यांनी केल्या. त्यावर ठेकेदाराची तयारी झाली आहे. पाऊस थांबल्यानंतर तातडीने हे काम हाती घेणार असल्याचे आयुक्त गोरे यांनी सांगितले.
....
कल्याण रोडची दुरुस्ती करणार
शहरातून जाणाऱ्या कल्याण रोड राष्ट्रीय महामार्ग दुरुस्त करण्याच्या सूचना यावेळी जगताप यांनी केल्या. सदर रस्त्याच्या दुरुस्तीचे पाऊस थांबल्यानंतर तातडीने हाती घेणार असल्याचे गोरे यांनी यावेळी सांगितले.
..
सूचना १४ महापालिका नावाने फोटो आहे.