बदनामी करणारांवर कठोर कारवाई करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:31 AM2021-02-23T04:31:05+5:302021-02-23T04:31:05+5:30
शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये कनिष्ठ महाविद्यालयातील कंत्राटी शिक्षिकांनी विनयभंगाची तक्रार केली आहे. या घटनेमुळे आम्हाला वाईट वाटले. साईबाबा कन्याशाळेत आम्ही ...
शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये कनिष्ठ महाविद्यालयातील कंत्राटी शिक्षिकांनी विनयभंगाची तक्रार केली आहे. या घटनेमुळे आम्हाला वाईट वाटले. साईबाबा कन्याशाळेत आम्ही पाचवी ते दहावी शिक्षण घेतलेले आहे. विद्यालयातील आमचा अध्यापक वर्ग आमच्यासाठी प्रेरणादायी व आदर्शवत आहे. मुख्याध्यापकांकडून अशा प्रकारची निंदनीय वागणूक घडणे शक्य नाही. प्रत्येक शैक्षणिक अडचणी सोडवतानाच शाळेतील गरजू विद्यार्थिनींना त्यांनी स्वखर्चाने वह्या, पुस्तके, गणवेश, परीक्षा फी यासाठी मदत केलेली आहे. विद्यार्थिनींचे नेहमीच मनोबल वाढवलेले आहे. त्यामुळे त्यांच्यावर केलेल्या खोट्या आरोपांचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो. या खोट्या आरोपांमुळे पंचक्रोशीत आदर्शवत असलेल्या आमच्या कन्याशाळेचीही बदनामी झालेली आहे. यापुढे खोट्या तक्रारी करणाऱ्या अपप्रवृत्तींना आळा बसावा, यासाठी साईबाबा संस्थानने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी माजी विद्यार्थिनींनी केली आहे.
निवेदनावर जेजुरकर, भडांगे, वायंदेशकर, काकड, आहेर, सोनवणे, खडके, सोनवणे, भोकरे, जेजुरकर, साठे, कोते, चौधरी, पाचोरे, चव्हाण यांची नावे आहेत.
२१ शिर्डी