तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा : श्रीरामपुरात काँग्रेसचे एक दिवशीय उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 04:21 PM2018-10-20T16:21:16+5:302018-10-20T16:21:21+5:30
श्रीरामपूर तालुका त्वरित दुष्काळग्रस्त जाहीर करावा, या मागणीसाठी श्रीरामपूर विधानसभा काँग्रेस कमिटीच्यावतीने प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव करण ससाणे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी महात्मा गांधी पुतळा मेन रोड येथे एक दिवसीय उपोषण केले.
श्रीरामपूर : श्रीरामपूर तालुका त्वरित दुष्काळग्रस्त जाहीर करावा, या मागणीसाठी श्रीरामपूर विधानसभा काँग्रेस कमिटीच्यावतीने प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव करण ससाणे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी महात्मा गांधी पुतळा मेन रोड येथे एक दिवसीय उपोषण केले.
दुष्काळाच्या यादीतून श्रीरामपूर तालुक्याचे नाव वगळल्याने बळीराजा दुहेरी संकटात सापडला आहे. एकीकडे अत्यल्प पावसाचे प्रमाण, बोंडअळी, उसाला लागलेली हुमणी अळी, महावितरणने सुरु केलेले भारनियमन, शेतीसाठीचे लांबलेले आवर्तन, जायकवाडीला हक्काचे पाणी सोडण्याचा झालेला निर्णय, अशा विविध अडचणीत शेतकरी ग्रासला आहे. श्रीरामपूर तालुका दुष्काळग्रस्त गावांच्या यादीतून वगळल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांवर जाणीवपूर्वक अन्याय होत असल्याचे उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी सांगितले.
यावेळी तहसीलदार सुभाष दळवी यांनी आश्वासन दिल्यानंतर दिवसभर सुरू असलेले ससाणे यांचे उपोषण लिंबूपाणी देऊन सोडण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नेते जी. के. पाटील, सचिन गुजर, नानासाहेब पवार, बाबासाहेब दिघे,संजय फंड, अरुण नाईक, अशोक पवार, यादवराव लबडे, रामशेठ वलेशा, नारायणराव डावखर, कॉ. श्रीधर आदिक, रमेश कोठारी, रमण मुथ्था, संजय छल्लारे, चित्रसेन रणनवरे, श्रीनिवास बिहाणी, भाऊसाहेब डोळस, मुक्तार शाह, दिलीप नागरे, आशाताई रासकर, भारतीताई परदेशी यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.