नगरच्या विद्यापीठ उपकेंद्रातून एका दिवसात टीसी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 05:33 PM2019-09-14T17:33:11+5:302019-09-14T17:33:52+5:30
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अहमदनगर उपकेंद्रात आता विद्यार्थ्यांना टीसी, मायग्रेशन, बोनाफाईड अशा सुविधा मिळणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी उपकेंद्रात सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे.
अहमदनगर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्याअहमदनगर उपकेंद्रात आता विद्यार्थ्यांना टीसी, मायग्रेशन, बोनाफाईड अशा सुविधा मिळणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी उपकेंद्रात सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहे.
शनिवारी प्रत्यक्ष काही विद्यार्थ्यांना या दाखल्यांचे वाटप झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यू आर्टस् कॉलेजचे प्राचार्य डॉ. भास्करराव झावरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून अहमदनगर कॉलेजचे प्राचार्य डॉ. रजनिश बार्नबस, विद्यापीठ सिनेट सदस्य प्रा. बाळासाहेब सागडे होते. उपकेंद्राचे संचालक डॉ. एन. आर. सोमवंशी यांनी सर्वांचे स्वागत केले.
यापूर्वी टीसी, मायग्रेशन, बोनाफाईड अशा कागदपत्रांसाठी विद्यार्थ्यांना ३० दिवस वाट पहावी लागत होती. तसेच आॅनलाईन अर्जामध्ये चुकीचा पत्ता किंवा पोस्टातून कागदपत्रे मागे गेली तर विद्यार्थ्यांना पुण्याला जावे लागत. परंतु ही सुविधा नगर उपकेंद्रात झाल्याने विद्यार्थ्यांचा वेळ, खर्च वाचणार आहे. तसेच ही कागदपत्रे विद्यार्थ्यांना नगर उपकेंद्रात एका दिवसात मिळणार आहेत, अशी माहिती उपकेंद्राचे संचालक डॉ. एन. आर. सोमवंशी यांनी दिली.