शिक्षक बँकेने आदर्श उभा केला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:21 AM2021-09-27T04:21:47+5:302021-09-27T04:21:47+5:30
नवले म्हणाले, बँकेने शिक्षकांना मोलाची मदत केली आहे. शिक्षक हा समाजातील हुशार घटक आहे. शिक्षकांच्या प्रत्येक हालचालीवर समाजाचे बारीक ...
नवले म्हणाले, बँकेने शिक्षकांना मोलाची मदत केली आहे. शिक्षक हा समाजातील हुशार घटक आहे. शिक्षकांच्या प्रत्येक हालचालीवर समाजाचे बारीक लक्ष असते. शिक्षक बँकेच्या चांगल्या योजनांचे अनुकरण इतर बँकांनी करण्याची गरज आहे. भविष्यातही दूरदृष्टी ठेवून आपण चांगले काम करावे. बाबासाहेब दिघे यांनी दुःखद प्रसंगांमध्ये कुटुंबाला आधार देणारा हा उपक्रम निश्चितपणे चांगला असल्याचे सांगितले. शिक्षणाधिकारी साईलता यांनी मदतीचा विनियोग चांगल्या प्रकारे करावा, असे आवाहन केले.
प्रास्तविक सलीमखान पठाण यांनी केले. ५१ सभासदांच्या वारसांना आज दोन कोटी ५५ लाख रुपयांची मदत पहिल्या टप्प्यामध्ये जिल्ह्यातील सर्व शाखांमधून वितरित केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सरदार पटेल, स्वामिनी गहिरे, सुनीता पवार, मुबश्शिरा शेख, नईमा खान, जगन्नाथ विश्वास, राजू थोरात, राजू इनामदार, शकील बागवान, संतोष वाघमोडे, दीपक शिंदे, श्याम पटारे, वाघुजी पटारे, सुजित बनकर, बाळासाहेब पाटोळे, गणेश पिंगळे, यास्मिन शेख, हबिबा शेख उपस्थित होते. शाखाधिकारी फैय्याज पठाण, संदीप कुलकर्णी, बापू भोर, संजय बोरसे, किरण बैरागी यांनी परिश्रम घेतले.
------
फोटो ओळी : शिक्षक बँक
शिक्षक बँकेच्या वतीने मयत सभासदांच्या वारसांना धनादेश प्रदान करताना शरद नवले व इतर मान्यवर.
--------