शिक्षक सुभाष खरबस यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:16 AM2021-05-31T04:16:38+5:302021-05-31T04:16:38+5:30
तालुक्यातील सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचे योगदान होते. अगस्ती महाविद्यालयात शिकताना प्रजासत्ताक दिनाच्या राष्ट्रीय कवायतीसाठी त्यांची झालेली निवड, नाटक- एकांकिकामधील त्यांची ...
तालुक्यातील सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचे योगदान होते. अगस्ती महाविद्यालयात शिकताना प्रजासत्ताक दिनाच्या राष्ट्रीय कवायतीसाठी त्यांची झालेली निवड, नाटक- एकांकिकामधील त्यांची भूमिका, अगस्ती विद्यालयातील सांस्कृतिक कार्यक्रमांतील त्यांनी साकारलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका, साईबाबा, पोतराज यांच्या भूमिका व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच राज्यातील व राज्याबाहेर झालेली हिंदी विषय शिक्षकांची अधिवेशने अकोलेकरांच्या कायम स्मरणात आहेत. मराठी चित्रपटांमध्येही भूमिका केल्या आहेत.
हरहुन्नरी कलाकार व व्यासंगी पत्रकार अशी त्यांची तालुक्याला ओळख असून वंचितांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ते धावून जात. तालुक्यात वृत्तसंकलनासाठी कॅमेरा घेऊन सुरू असलेली त्यांची धावपळ कोविडकाळातही सुरू होती.
अकोले अमरधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अगस्ती एज्युकेशन सोसायटी, तालुका पत्रकार संघ, प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटना, अगस्ती सांस्कृतिक मंडळ, अकोलेकर कला मंच, नवलेवाडी-रुंभोडी-इंदोरी-मेहेंदुरी ग्रामस्थ यांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, मुलगी, मुलगा असा परिवार आहे. शिक्षक रमेश खरबस यांचे ते मोठे भाऊ होते.