शिक्षक बँकेतील घड्याळ खरेदी पारदर्शकच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:16 AM2021-05-28T04:16:13+5:302021-05-28T04:16:13+5:30

जिल्हा शिक्षक संघाचे नेते बापूसाहेब तांबे यांच्या नेतृत्वाखाली विद्यमान संचालक मंडळ हे सभासद हिताचे कार्य करीत आहे. विरोधकांनी केलेले ...

Teachers buy bank watches transparently | शिक्षक बँकेतील घड्याळ खरेदी पारदर्शकच

शिक्षक बँकेतील घड्याळ खरेदी पारदर्शकच

जिल्हा शिक्षक संघाचे नेते बापूसाहेब तांबे यांच्या नेतृत्वाखाली विद्यमान संचालक मंडळ हे सभासद हिताचे कार्य करीत आहे. विरोधकांनी केलेले आरोप व बँकेत झालेली घड्याळ खरेदी प्रक्रिया व पुरावे चौकशी अधिकारी खेडकर यांनी तपासले. तसेच शिक्षक बँकेने कंपनीशीच थेट करार करून घड्याळे खरेदी केली आहेत व सर्व रक्कम आरटीजीएसद्वारे कंपनीला दिली आहे. ही सर्व घड्याळ खरेदीची प्रक्रिया पारदर्शी झाली आहे, असा स्पष्ट उल्लेख चौकशी अहवालात नमूद केलेला आहे. मात्र, विरोधकांनी चौकशीत संचालक दोषी आहेत, अशा प्रकारचा कांगावा करून बँकेची बदनामी केली आहे, असे बँकेचे उपाध्यक्ष बाबासाहेब खरात यांनी सांगितले.

केवळ तांत्रिक बाबीचा मुद्दा घेऊन चौकशी समितीच्या वेळी घड्याळवाटप न झालेल्या २३३६ घड्याळांची आकडेवारी त्यात नमूद केली आहे. शिक्षक बँकेच्या सभासदांना शताब्दी वर्षानिमित्त घड्याळभेटीचे वितरण अद्यापही सुरू आहे. घड्याळ खरेदीस सर्वसाधारण सभेने मान्यता दिली आहे. ही बाब चौकशी समितीने अधोरेखित केली आहे. त्यामुळे विरोधकांनी केलेला आरोप खोटा आहे, हे आता सिद्ध झाले आहे, असे माजी अध्यक्ष संतोष दुसुंगे, साहेबराव अनाप, शरद सुद्रिक, राजू राहणे, अर्जुन शिरसाठ, उषा बनकर, विद्याताई आढाव, बाळासाहेब मुखेकर, किसन खेमनर, गंगाराम गोडे, सुयोग पवार आदींनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

…............

अंध भक्तांनी खोटेपणा थांबवावा

विरोधकांना सर्व वस्तुस्थिती माहीत असताना केवळ राजकारण आणि बँकेची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून खोटे आरोप करून सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सभासदांची दिशाभूल करून सत्ता प्राप्त करण्याचे दिवस आता गेले आहेत. अंध भक्तांनी आता तरी सत्य स्वीकारून खोट्या बातम्या देऊन बँकेची बदनामी करू नये, असे आवाहन गुरुमाऊली मंडळाचे जिल्हाध्यक्ष राजकुमार साळवे यांनी केले आहे.

Web Title: Teachers buy bank watches transparently

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.