जत तालुक्यातून शिक्षकाचे कुटुंब बेपत्ता, मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील : पत्नीसह दोन लहान मुलांचा समावेश

By चंद्रकांत शेळके | Published: July 2, 2023 05:41 PM2023-07-02T17:41:28+5:302023-07-02T17:42:45+5:30

गेल्या पाच दिवसांपासून हे दोन लहान मुले व पत्नी बेपत्ता असून पोलिसांना अद्याप कोणताही सुगावा लागलेला नाही.

Teacher's family missing from Jat taluka, originally from Ahmednagar district: including wife and two small children | जत तालुक्यातून शिक्षकाचे कुटुंब बेपत्ता, मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील : पत्नीसह दोन लहान मुलांचा समावेश

जत तालुक्यातून शिक्षकाचे कुटुंब बेपत्ता, मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील : पत्नीसह दोन लहान मुलांचा समावेश

अहमदनगर : मुलांना शाळेत सोडण्यासाठी गेलेली पत्नी व दोन लहान मुले जत (जि. सांगली) तालुक्यातून बेपत्ता झाली असल्याची तक्रार शिक्षक सुभाष कचरे यांनी जत पोलिस ठाण्यात दिली आहे. पाच दिवसांनंतरही अद्याप या कुटुंबाचा शोध लागलेला नाही.

सुभाष दत्तात्रय कचरे (वय ३५, मूळ राहणार पळसुंदे, ता. अकोले, जि. अहमदनगर) हे गेल्या काही वर्षांपासून जत तालुक्यातील एका हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. ते आपली पत्नी सोनाली (वय ३० वर्षे), मुले अर्णव (वय ६ वर्षे) व शिवम (वय ३.५ वर्षे) यांच्यासोबत जतमध्ये राहतात. दि. २८ जून रोजी सकाळी नेहमीप्रमाणे ते हायस्कूलवर शिकवण्यासाठी घरातून निघून गेले. सकाळी अकराच्या सुमारास त्यांची पत्नी सोनाली हिस फोन करून मुलांना शाळेत सोडले का? असे त्यांनी विचारले. त्यावर मुलांना शाळेत सोडायलाच चालले आहे, असे तिने सांगितले. त्यानंतर तिचा फोन बंद झाला. शाळेतून घरी आल्यानंतर माझे कुटुंब घरी नव्हते. शेजारी चौकशी केली असता दुपारपासून घर बंद असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर लगेच कचरे यांनी जत पोलिसांत कुटुंब बेपत्ता असल्याची तक्रार दिली.

गेल्या पाच दिवसांपासून हे दोन लहान मुले व पत्नी बेपत्ता असून पोलिसांना अद्याप कोणताही सुगावा लागलेला नाही. शाळेत गेलेली मुले व पत्नी गायब कसे झाले, याचा शोध पोलिसांनी तातडीने घ्यावी, अशी मागणी या शिक्षकाने पोलिसांकडे केली आहे.

सर्व नातेवाइकांकडे विचारपूस
सुभाष कचरे यांनी सर्व नातेवाइकांकडे याबाबत विचारणा केली, मात्र अद्याप या कुटुंबाचा शोध लागलेला नाही. त्यांचे बरेचसे नातेवाईक जतमध्ये आले असून कसून शोधमोहीम सुरू आहे.

सीसीटीव्ही, लोकेशन तपासण्याची मागणी
कचरे यांची पत्नी मुलांना शाळेत सोडायला गेली होती. परंतु ती घरी आलीच नाही. शाळेत चौकशी केली असता मुले शाळेत आलीच नसल्याची माहिती मिळाली. त्यामुळे हे तिघे कोठे गेले? त्यांचे कोणी अपहरण केले की आणखी काय? याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे पोलिसांनी आसपासचे सीसीटीव्ही तपासून, तसेच कचरे यांच्या पत्नीच्या मोबाइल लोकेशनवरून त्यांचा शोध लावावा, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.

Web Title: Teacher's family missing from Jat taluka, originally from Ahmednagar district: including wife and two small children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.