शिक्षकांनी केली साडेतीन लाखांची वर्गणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:20 AM2021-05-11T04:20:56+5:302021-05-11T04:20:56+5:30
तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या हस्ते ग्रामीण रुग्णालयास पाच मशीन, तर नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्या हस्ते पालिका रुग्णालयाला दोन मशीन ...
तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या हस्ते ग्रामीण रुग्णालयास पाच मशीन, तर नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्या हस्ते पालिका रुग्णालयाला दोन मशीन देण्यात आल्या. यावेळी मुख्याधिकारी गणेश शिंदे, डॉ. संकेत मुंदडा, सचिन पऱ्हे, शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी ज्ञानेश्वर पटारे, केतन खोरे, अल्तमेश पटेल उपस्थित होते. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश बंड, डॉ. तौफिक शेख व डॉ. जयश्री वमने यांनी पाच मशीनचा स्वीकार केला.
कोरोना संकटामध्ये अनेक सेवाभावी संघटना व कार्यकर्ते पुढे येऊन काम करीत आहेत. श्रीरामपूर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी मतभेद विसरून कोरोनाच्या मदतीसाठी संघटित काम करण्यासाठी एक समन्वय समिती गठीत करून ३ लाख ५० हजारांचा निधी जमा करणे, ही कौतुकास्पद बाब असल्याचे गौरवोद्गार तहसीलदार पाटील व नगराध्यक्षा आदिक यांनी काढले.
---
फोटो ओळी : शिक्षक समिती
तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी एकत्रित येत तहसीलदार प्रशांत पाटील यांच्याकडे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट दिले.