शिक्षक, शिक्षकेतरांचे पगार द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:21 AM2021-05-12T04:21:34+5:302021-05-12T04:21:34+5:30
शिक्षक भारतीचे आ. कपिल पाटील, राज्याध्यक्ष अशोक बेलसरे यांनी याबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदन दिले असल्याची माहिती ...
शिक्षक भारतीचे आ. कपिल पाटील, राज्याध्यक्ष अशोक बेलसरे यांनी याबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदन दिले असल्याची माहिती शिक्षक नेते तथा शिक्षक भारतीचे राज्य सचिव सुनील गाडगे यांनी दिली.
राज्यातील शिक्षक, शिक्षकेतरांचे ‘एप्रिल पेड इन मे’चे पगार ११ तारीख उलटली तरी झालेले नाहीत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय उपचार, कौटुंबिक जबाबदारी, विविध कर्जाचे हफ्ते आणि उशिरा होणारे पगार यामुळे शिक्षक, कर्मचारी मेटाकुटीला आले आहेत. तसेच रमजानचा सणही आला आहे. १४ मे ला रमजान ईद आणि अक्षय तृतीया आहे. त्यामुळे रमझान ईद आणि अक्षय तृतीयापूर्वी तातडीने पगार करावेत, अशी मागणी
जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब जगताप, महिला जिल्हाध्यक्ष आशा मगर, योगेश हराळे, विजय कराळे, बाबासाहेब लोंढे, जितेंद्र आरू, महेश पाडेकर, किशोर डोंगरे, संभाजी पवार, हनुमंत रायकर, सुदाम दिघे, नवनाथ घोरपडे, गोरखनाथ गव्हाणे, कैलास जाधव, संजय भुसारी, संतोष देशमुख, जिल्हा महिलाध्यक्ष आशा मगर, विभावरी रोकडे, मीनाक्षी सूर्यवंशी, रोहिणी भोर, शकुंतला वाळुंज, छाया लष्करे, जया गागरे, अनघा सासवडकर यांनी केली आहे.