कोरोना उपचारासाठी शिक्षकांना विशेष रजा मंजूर करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:19 AM2021-01-21T04:19:49+5:302021-01-21T04:19:49+5:30
अहमदनगर : ज्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोना झाला त्यांनी उपचारासाठी त्या काळात रजा घेतलेली आहे. ती रजा अर्जित ...
अहमदनगर : ज्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोना झाला त्यांनी उपचारासाठी त्या काळात रजा घेतलेली आहे. ती रजा अर्जित रजेतून वजा केली जाते; परंतु यासाठी विशेष रजा मंजूर करावी, अशी मागणी शिक्षक भारतीने शिक्षणमंत्र्यांना भेटून केली असल्याची माहिती शिक्षक नेते तथा शिक्षक भारतीचे राज्य सचिव सुनील गाडगे यांनी दिली.
आमदार कपिल पाटील, राज्याध्यक्ष अशोक बेलसरे यांनी याबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेतली. कोरोनाकाळात अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोना झाला. त्यासाठी त्यांनी दवाखान्यात उपचार घेतले. यासाठी अनेकांची अर्जित रजा खर्च झाली; परंतु कोरोनाकाळात उपचार घेतले असतील तर त्यासाठी विशेष रजा मंजूर करून शासनाने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा तसे आदेश काढावेत, अशी मागणी शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, जिल्हा माध्यमिकचे सचिव विजय कराळे, कार्याध्यक्ष बाबासाहेब लोंढे, योगेश हराळे, उर्दू माध्यमिकचे जिल्हाध्यक्ष मोहंमद समी शेख, माध्यमिकच्या महिला जिल्हाध्यक्ष आशा मगर, उच्च माध्यमिकचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र आरु, उच्च माध्यमिकचे जिल्हा सचिव महेश पाडेकर, कार्याध्यक्ष किशोर डोंगरे, संभाजी पवार, हनुमंत रायकर, सुदाम दिघे, संतोष मगर, संजय तमनर, संतोष देशमुख, नवनाथ घोरपडे, गोरखनाथ गव्हाणे, श्रीकांत गाडगे, विलास गाडगे, संभाजी चौधरी, किसन सोनवणे, कैलास जाधव, महिला सचिव विभावरी रोकडे, कार्याध्यक्ष मीनाक्षी सूर्यवंशी, रोहिणी भोर, शकुंतला वाळुंज, छाया लष्करे, जया गागरे, संध्या गावडे, अनघा सासवडकर, रेवण घंगाळे, जॉन सोनवणे आदींनी केली आहे.