शिक्षकांनी समुपदेशकांची भूमिका पार पाडली पाहिजे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:22 AM2021-05-20T04:22:09+5:302021-05-20T04:22:09+5:30
शिक्षण प्रसारक संस्थेच्या संगमनेर महाविद्यालयात मंगळवारी (दि. १९) अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाद्वारे आयोजित विशेष ऑनलाईन व्याख्यानात ते बोलत होते. ...
शिक्षण प्रसारक संस्थेच्या संगमनेर महाविद्यालयात मंगळवारी (दि. १९) अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाद्वारे आयोजित विशेष ऑनलाईन व्याख्यानात ते बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड, उपप्राचार्य डॉ. राजेंद्र लढ्ढा, उपप्राचार्य डॉ. रवींद्र ताशिलदार, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रा. श्रीहरी पिंगळे, शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भालचंद्र भावे, प्राचार्य प्रा. डॉ. राहुल देशमुख, श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. राजेंद्र ढमक, पर्यवेक्षक प्रा. आप्पासाहेब गुंजाळ आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक प्राचार्य डॉ. गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रा. श्रीहरी पिंगळे यांनी मानले. वरिष्ठ व श्रमिक कनिष्ठ महाविद्यालय, बी.एड, डी.एड. व विधी महाविद्यालयातील सुमारे दोनशेहून अधिक प्राध्यापकांनी या व्याख्यानाचा लाभ घेतला.