शिक्षक संघटनेचे धरणे आंदोलन स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:21 AM2021-02-11T04:21:54+5:302021-02-11T04:21:54+5:30

कोपरगाव : चांदेकसारे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे उपशिक्षक विलास शिंदे यांना ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेत टाकळी येथे कर्तव्यावर असताना ...

Teachers' union suspends agitation | शिक्षक संघटनेचे धरणे आंदोलन स्थगित

शिक्षक संघटनेचे धरणे आंदोलन स्थगित

कोपरगाव : चांदेकसारे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे उपशिक्षक विलास शिंदे यांना ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेत टाकळी येथे कर्तव्यावर असताना हृदयविकाराचा झटका येऊन उपचारादरम्यान काही दिवसानंतर मृत्यू झाला होता. त्यानंतर, त्याच्या कुटुंबीयांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी, यासाठी कोपरगाव तालुका प्राथमिक शिक्षक समन्वय समितीने गुरुवारी ११ फेब्रुवारीला तहसील कार्यालयासमोर दुपारी ३ वाजता धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. तसे निवेदनही ४ फेब्रुवारीला तहसीलदार योगेश चंद्रे यांना दिले होते.

परंतु तहसीलदार चंद्रे यांनी मयत शिक्षक शिंदे यांच्या कुटुंबीयांना शासकीय मदत मिळवून देण्यासाठी कार्यालयीन स्तरावर पाठपुरावा सुरू केला आहे. तसा पत्रव्यवहारही त्यांनी शिक्षक संघटनेशी केला आहे. त्यामुळे शिक्षक संघटनेच्या वतीने करण्यात येणारे धरणे आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हासंपर्क प्रमुख अशोक कानडे यांनी दिली आहे.

Web Title: Teachers' union suspends agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.