येशू ख्रिस्तांची शिकवण समाजासाठी दिशादर्शक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:17 AM2020-12-26T04:17:40+5:302020-12-26T04:17:40+5:30
अहमदनगर : प्रार्थनास्थळे मानवी जीवनातील उत्साह वाढविणारे प्रेरणास्रोत आहेत. या माध्यमातून सत्कर्म करण्याची भावना जागृत होते. प्रभू येशू ...
अहमदनगर : प्रार्थनास्थळे मानवी जीवनातील उत्साह वाढविणारे प्रेरणास्रोत आहेत. या माध्यमातून सत्कर्म करण्याची भावना जागृत होते. प्रभू येशू ख्रिस्तांची शिकवण समाजासाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन रेव्ह. विद्यासागर भोसले यांनी ह्यूम मेमोरियल चर्च येथील प्रार्थनेच्या वेळी केले.
नाताळनिमित्त येथील ह्यूम चर्चमध्ये प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार संग्राम जगताप, रेव्ह. जे. आर. वाघमारे, ले. लीडर. रणनवरे, सेक्रेटरी मनस्विनी सोंतले, खजिनदार सॅम्युअल खरात, प्रसन्ना शिंदे, अमोल लोंढे, अजित ठोकळ, तसेच पस्टरेत कमिटी, शाभाथ शाळा, ज्येष्ठ संघ आणि मंडळीचे सभासद, तसेच हर्षल जाधव, शमशोन शिंदे, ऋतिक चांदेकर, पीटर शिंदे, प्रथमेश शिंदे, स्मितिष जाधव, लुकस शिंदे, हर्षल पाटोळे, स्तवन साळवे अहरव पतरे, मृदुल भोसले, जोएल सूर्यवंशी, सॅम्युअल पिंटो, हर्ष उजगरे, वैभव साळवे, संदेश लाड, आशिष चांदेकर, यश उजगरे, स्तवन जाधव, सुधीर जाधव, तन्मय क्षेत्रे, जय वानखेडे, गौरव म्हस्के, आशिष व्हेनोन, तुषार पोळ आदी उपस्थित होते. प्रार्थनेच्या वेळी सेक्रेटरी जॉन्सन शेक्सपीअर म्हणाले की, कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे खबरदारी घेण्यात येत असून, शासन निर्देशांचे पालन करण्यात आले आहे.
...
जातपडताळणी कार्यालयात गर्दी
अहमदनगर : महाविद्यालयांच्या प्रवेशासह ग्रामपंचायतींच्या निवडणुका सुरू असल्याने शुक्रवारी सुटीच्या दिवशीही जातपडताळणी कार्यालय सुरू हाेते. जातपडताळणी प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यांसह ग्रामपंचायत उमेदवारांनी गर्दी केली होती.
...
ॲप डाऊनलोड करण्याचा आदेश
अहमदनगर : महापालिकेने स्वच्छ भारत अभियानात सहभाग घेतला आहे. चालू वर्षी मानांकन मिळविण्यासाठी आरोग्य विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. इतर विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना अभियानात सहभागी करून घेण्यात येत असून, ॲप डाऊनलोड करून घेण्याचा आदेश आस्थापना विभागाने कर्मचाऱ्यांना दिला आहे.
...
वसुली मोहिमेला वेग
अहमदनगर : महापालिकेने थकीत कर वसुलीसाठी मोहीम हाती घेतली आहे. शहर व परिसरातील अनधिकृत पत्र्याच्या शेडचे मोजमाप करून कर आकारणी करण्यात येणार आहे, तसेच थकबाकीदारांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, कर न भरल्यास कारवाई करण्यात येणार आहे.
...
विद्युत विभाग प्रमुखाचे पद रिक्त
अहमदनगर : महापालिकेच्या विद्युत विभागाचे प्रमुख आर.जी. मेहेत्रे हे रजेवर गेले आहेत. हे पद रिक्त असल्याने नगररचना विभागातील अभियंता वैभव जोशी यांची विद्युत विभाग प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसा आदेश आस्थापना विभागाने काढला आहे. मात्र, जोशी हे विद्युत विभागात हजर झाले नाहीत. त्यामुळे हे पद रिक्त असून, यामुळे मनपाचा स्मार्ट एलईडी प्रकल्प रखडला आहे.