पोलीस कोठडीत रक्षाबंधन अन् आरोपींच्या डोळ्यात अश्रू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:23 AM2021-08-23T04:23:46+5:302021-08-23T04:23:46+5:30
श्रीगोंदा : येथील पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी, कर्मचारी व पोलीस कोठडीतील आरोपींना येथील अरिहंत गृह उद्योग महिला मंडळाच्या भगिनींनी ...
श्रीगोंदा : येथील पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी, कर्मचारी व पोलीस कोठडीतील आरोपींना येथील अरिहंत गृह उद्योग महिला मंडळाच्या भगिनींनी राख्या बांधून रक्षाबंधन साजरे केले. यावेळी काही आरोपींना अश्रू अनावर झाले.
अरिहंत महिला मंडळाच्या अध्यक्ष प्रतिभा गांधी, रोहिणी जगताप, कविता सांगळे, निशा राऊत, रूपाली लोंढे यांनी रक्षाबंधन करून स्नेहाचे बंध गुंफले.
पोलीस कोठडीत रक्षाबंधन झाले. यावेळी काही आरोपींना अश्रू अनावर झाले.
श्रीगोंदा येथील कोठडीची आरोपी ठेवण्याची क्षमता ४५ आहे. मात्र या कोठडीतील चार बरागीत ७९ आरोपी आहेत. त्यात चार महिला आरोपी आहेत. ऑक्सिजन कमी पडत असल्याने आरोपींना श्वास घेणे अवघड झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्स पाळणे बंधनकारक आहे. मात्र येथे त्या नियमाचा फज्जा उडाला आहे. त्यामुळे कोविड प्रसाराचीही शक्यता आहे. येथील काही आरोपींचे सबजेलला स्थलांतर होणे गरजेचे आहे.
---
श्रीगोंदा येथील कोठडीत क्षमतेपेक्षा आरोपींची संख्या दुप्पट आहे. यातील निम्मे आरोपी नगर येथील सबजेलमध्ये पाठविण्यासंदर्भात तातडीने पावले उचलणार आहे.
-चारुशीला पवार,
प्रभारी तहसीलदार, श्रीगोंदा
----
२१ श्रीगोंदा जेल
श्रीगोंदा येथील पोलीस ठाण्यातील आरोपींना अरिहंत महिला मंडळाच्या सदस्यांनी राख्या बांधल्या.