गिफ्टचे अमिष दाखवून तरूणांची आॅनलाईन फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 06:40 PM2018-06-19T18:40:43+5:302018-06-19T18:41:05+5:30

बजाज फायनान्समधून बोलत असून, तुम्हाला फिल्पकार्डकडून गिफ्टकार्ड मिळाले असल्याचे सांगत दोघा तरूणांची ५९ हजार रूपयांची आॅनलाईन फसवणूक करण्यात आली. १२ ते १३ एप्रिल दरम्यान ही घटना घडली.

Teenage online fraud by showing unrealistic gift | गिफ्टचे अमिष दाखवून तरूणांची आॅनलाईन फसवणूक

गिफ्टचे अमिष दाखवून तरूणांची आॅनलाईन फसवणूक

अहमदनगर: बजाज फायनान्समधून बोलत असून, तुम्हाला फिल्पकार्डकडून गिफ्टकार्ड मिळाले असल्याचे सांगत दोघा तरूणांची ५९ हजार रूपयांची आॅनलाईन फसवणूक करण्यात आली. १२ ते १३ एप्रिल दरम्यान ही घटना घडली.
याप्रकरणी अनिल सूर्यभान तागड (वय २८रा़ शिलेगाव ता़ राहुरी) याने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. १२ एप्रिल रोजी तागड याला फोन आला. बजाज फायनान्समधून बोलत असल्याचे सांगत गिफ्टकार्डची पुढील प्रक्रिया करण्यासाठी त्याने जन्म तारीख आणि आकाऊंटचा ओटीपी क्रमांक विचारून घेतला.  त्यानंतर समोरील व्यक्तीने तागड याच्या बजाज फायनान्सच्या खात्यावरून २२ हजार २९० रूपयांची आॅनलाईन खरेदी केली. त्यानंतर दुसऱ्या मोबाईल क्रमांकावरून कोळपेवाडी (ता़ कोपरगाव) येथील सुनील नारायन मोरे यांनाही अशाच पद्धतीने फोन करून त्यांच्या बजाज फायनान्सच्या खात्यातून आॅनलाईन ३५ हजार ९९८ रूपयांचे प्रॉटक्ट खरेदी करून फसवणूक केली. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्याचे निरिक्ष सुनील पवार पुढील तपास करत आहेत.

 

Web Title: Teenage online fraud by showing unrealistic gift

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.