भाजप नेत्याकडून तहसीलदारांचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 10:22 PM2020-09-17T22:22:49+5:302020-09-17T22:23:10+5:30
पारनेर (जि. अहमदनगर ) : भाजपचे नेते व अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांच्यावर तहसीलदारांचा विनयभंग केल्याप्रकरणी ...
पारनेर (जि. अहमदनगर) : भाजपचे नेते व अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांच्यावर तहसीलदारांचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच तहसीलदारांकडे खंडणी मागणे, सरकारी कामात अडथळा आणणे याप्रकरणीही झावरे यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
गुरुवारी (दि.१७) दुपारी पारनेर तहसील कार्यालयात भाजपचे नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे कार्यकर्त्यांसह कांदा निर्यातबंदी विरोधात निवेदन देण्यासाठी आले होते. त्यावेळी बैठक सुरु असल्यामुळे देवरे यांनी झावरे यांना काही वेळ थांबण्याचा निरोप दिला. त्यानंतर झावरे कार्यकर्त्यांसह देवरे यांच्या दालनात गेले. त्यावर फक्त पाच जणांनी यावे, अशी सूचना तहसीलदारांनी केली होती.
यावरुन देवरे-झावरे यांच्यामध्ये खडाजंगी झाली. हे वाद विकोपाला गेले. त्यानंतर देवरे यांनी पारनेर पोलीस ठाण्यात झावरे यांच्या विरोधात फिर्याद दिली. या फिर्यादीत म्हटले आहे, मी दालनात काम करीत असताना झावरे यांनी गैरकायद्याने जमाव जमवून दमदाटी, शिवीगाळ, विनयभंग केला.