लोकसहभागातून उभारले ४० लाखाचे ज्ञानमंदिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2019 11:33 AM2019-09-08T11:33:27+5:302019-09-08T11:33:27+5:30
पारनेर तालुक्यातील वाघुंडे येथे लोकसहभाग, तरुणाईचे प्रयत्न, ज्येष्ठांचे मार्गदर्शन यातून जवळपास ४० लाख रूपये खर्चून शाळेची इमारत (ज्ञान मंदिर) उभारली आहे. ही इमारत अवघ्या सहा महिन्यात उभी राहिली.
शिवाजी पानमंद
सुपा : पारनेर तालुक्यातील वाघुंडे येथे लोकसहभाग, तरुणाईचे प्रयत्न, ज्येष्ठांचे मार्गदर्शन यातून जवळपास ४० लाख रूपये खर्चून शाळेची इमारत (ज्ञान मंदिर) उभारली आहे. ही इमारत अवघ्या सहा महिन्यात उभी राहिली. त्याचबरोबर इ-लर्निंगसह डिजीटल क्लासरूमचा शिक्षकदिनी आरंभ करण्यात आला.
शहरातील मुलांप्रमाणे आपल्यालाही आधुनिक ज्ञान, तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण मिळणार असल्याने पालकांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. बाळानंद स्वामी विद्यालय पूर्वी असणाºया संस्था चालकाने जानेवारी २०१७ मध्ये बंद करण्याचा निर्णय घेतला होता. गावातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य टांगणीला लागले होते. इतरत्र शाळेसाठी जावे लागणार, खर्च वाढणार, मुलींच्या शाळेचे काय? असे प्रश्न होते. गावातील कारभारी मंडळी व युवा सरपंच संदीप मगर, जयसिंग मगर, संतोष पवार, बाबासाहेब मगर, शत्रुघ्न मगर, प्रा. राम मगर आदी मंडळींनी विद्यालय गावाने चालवण्यासाठी घेण्याचा निर्णय घेतला.
गावात उपलब्ध होईल तेथे वर्ग भरवून शाळा सुरू ठेवली. तरुणाई सरपंच मगर यांच्या पाठीशी उभी राहिली. इमारत बांधकाम सुरू केल्यावर बांधकाम साहित्य, रोख मदतीचा ओघ सुरू झाला. या कामी मुख्याध्यापक नारायण साठे, राजेंद्र गोडसे यांनीही सहभाग घेतला. अवघ्या सहा महिन्यात गावकºयांनी लोकसहभागातून इमारत उभारली. सुपा एमआयडीसीतील कारखानदारांना भेटून त्यांच्याकडून डिजिटलशाळा करण्यासाठी निधी मिळवला.
शिक्षक दिनाचे औचित्य साधून ‘मायडिया’चे प्रॉडक्शन मॅनेजर निलेश ढगे, ‘ओम्नी अॅक्टिव्ह’चे मुख्य अधिकारी महिपाल संचेती यांच्या हस्ते डिजीटल क्लासरूमचे उद्घाटन झाले.