श्रीगोंद्यातील ज्ञानमंदिरे बनली आरोग्य मंदिरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:21 AM2021-05-20T04:21:47+5:302021-05-20T04:21:47+5:30
श्रीगोंदा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तालुक्यातील ज्ञान मंदिरे आरोग्य मंदिरे बनली आहेत. या माध्यमातून जवळपास तीन हजार (२,९०९) रुग्ण ...
श्रीगोंदा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तालुक्यातील ज्ञान मंदिरे आरोग्य मंदिरे बनली आहेत. या माध्यमातून जवळपास तीन हजार (२,९०९) रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ६४७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
कोरोनामुळे तालुक्यातील ३७२ प्राथमिक शाळा, ७५ विद्यालये व ५-६ महाविद्यालये ही सर्व ज्ञान मंदिरे एक वर्षापासून बंद आहेत. कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी शाळा, विद्यालये, वसतिगृहात सेवाभावी वृत्तीतून कोविड सेंटर सुरू आहेत. श्रीगोंदा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलींचे वसततिगृह, छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे मुलींचे वसतिगृह, आढळगावचे पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय, चांडगावचे न्यू इंग्लिश स्कूल, वांगदरीची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, लोणी व्यंकनाथचे श्री व्यंकनाथ विद्यालय, मढेवडगावची प्राथमिक शाळा, घारगावची प्राथमिक शाळा, कोळगावचे कोळाईदेवी विद्यालय, पिंपळगाव पिसा येथील सावित्रीबाई फुले महाविद्यालय, देवदैठणची विद्याधाम प्रशाला, मांडवगणचे सोनूबाई महाजन विद्यालय, चिंभळेची प्राथमिक शाळा चिंभळे, येळपणेचे खंडेश्वर माध्यमिक विद्यालय ही ज्ञानमंदिरे तसेच श्रीगोंदा येथील रत्नकमल मंगल कार्यालय, इंद्रायणी मंगल कार्यालय, लिंपणगावचे सिद्धेश्वर सांस्कृतिक भवन, पिंप्री कोलंदरचा सत्यशोधक आश्रम आदी ठिकाणी रुग्णसेवेचा यज्ञ चालू आहे. लोणी व्यंकनाथ येथील श्री व्यंकनाथ कोविड सेंटरमध्ये सर्वाधिक ३७४ रुग्णांनी कोरोनावर मात केली.
---
१६ मे अखेरची रुग्ण स्थिती
कोविड सेंटरचे नाव सध्याचे रुग्ण कोरोनामुक्त
डॉ. आंबेडकर मुलींचे वसतिगृह ९८ ९१५
छत्रपती विद्यालय मुलींचे वसतिगृह ८६ ७३२
संत शेख महंमद महाराज ३४ ५०
आढळगाव १५ १२५
चांडगाव १९ २२
लिंपणगाव ३० ६०
वांगदरी १४ ००
मढेवडगाव ३२ २४
मांडवगण १४ २०
लोणी व्यंकनाथ ४१ ३७४
चिंभळे २६ ५१
कोळगाव ४३ १९०
पारगाव सुद्रिक २६ १८
घारगाव २७ १५५
पिंपळगाव पिसा ४२ १५५
देवदैठण २७ १८
पिंप्री कोंलदर २ ००
येळपणे ५ ००
इतर शाळा ५८ ००
.....
कामगिरीला सलाम
श्रीगोंदा तालुक्यात सेवाभावीवृत्तीने कोविडमध्ये सध्या ६४७ रुग्णांवर उपचार चालू आहेत. आनंदाची बाब म्हणजे या खासगी कोविड सेंटरमध्ये १ हजार २६२ रुग्णांनी तर वसतिगृहातील दोन शासकीय सेंटरमधून १ हजार ६४७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. रुग्णसेवेतील बाजीगर कामगिरीला सलाम करतो.
-डॉ. नितीन खामकर,
तालुका वैद्यकीय अधिकारी
---
दोन फोटो
१९ श्रीगोंदा कोविड, १