मंदिर, तीर्थस्थळे आणखी काही दिवस लॉकच-नवाब मलिक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 07:18 PM2020-09-16T19:18:44+5:302020-09-16T19:19:18+5:30

अहमदनगर : राज्यातील मंदिरे तीर्थस्थळे आणखी काही दिवस बंद राहतील, असे संकेत अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मालिक यांनी बुधवारी दिले़ गर्दी होऊन संसर्ग वाढण्याची भिती आहे़ त्यामुळे मंदिरे व तीर्थस्थळे उघडण्याबाबत सरकार सावध भूमिका घेत आहे, असे त्यांनी नगर येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले़

Temples, shrines a few more days Lockach-Nawab Malik | मंदिर, तीर्थस्थळे आणखी काही दिवस लॉकच-नवाब मलिक 

मंदिर, तीर्थस्थळे आणखी काही दिवस लॉकच-नवाब मलिक 

अहमदनगर : राज्यातील मंदिरे तीर्थस्थळे आणखी काही दिवस बंद राहतील, असे संकेत अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मालिक यांनी बुधवारी दिले़ गर्दी होऊन संसर्ग वाढण्याची भिती आहे़ त्यामुळे मंदिरे व तीर्थस्थळे उघडण्याबाबत सरकार सावध भूमिका घेत आहे, असे त्यांनी नगर येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले़

 अल्प संख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे मंत्री मंडळाच्या बैठकीला उपस्थिती लावली़ या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते़ ते म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे़ मंदिरे व तीर्थस्थळे उघडण्याची मागणी होत आहे़ परंतु, मंदिरे तीर्थस्थळांमध्ये गर्दी होऊन संसर्ग वाढण्याची भिती आहे़ त्यामुळे नागरिकांची अडचण होर्अल़ हे लक्षात घेऊन सरकार निश्चितपणे जनतेच्या हिताचे निर्णय घेत आहे. याबाबत मुख्यमंत्री सावध भूमिका घेत असल्याचे मलिक म्हणाले़ विरोधकांकडून कोरोनाच्या संकट काळातही राजकारण केले जात आहे़ बिहारची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन राजकारण केले जात असून, संकटाचा गैरफायदा विरोधक घेत असल्याचा आरोप मलिक यांनी केला़
़़़
लस येईपर्यंत मुकाबला 
राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या मोठी आहे़ लस येईपर्यंत या महामारीचा मुकाबला करावा लागेल़ सरकार गंभीरपणे पावले उचलत आहे़ सरकारने दिलेल्या सूचनांचे पालन नागरिकांनी करावे़ नियमांचे पालन केल्यास रुग्णांची संख्या कमी होण्यास मदत होईल, असे नवाब मलिक म्हणाले़ 

Web Title: Temples, shrines a few more days Lockach-Nawab Malik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.