नगर शहराच्या विकासासाठी दहा कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:21 AM2021-02-13T04:21:01+5:302021-02-13T04:21:01+5:30
अहमदनगर : नगर शहराच्या विकासासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दहा कोटी रुपये देण्याची घोषणा केली असून, पिंपळगाव माळवी ...
अहमदनगर : नगर शहराच्या विकासासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दहा कोटी रुपये देण्याची घोषणा केली असून, पिंपळगाव माळवी येथे अम्युझमेंट पार्क उभारण्याबाबतचा आराखडा तया करण्याच्या सूचनाही यावेळी शिंदे यांनी केल्या.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन भवनात शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीत महापौर बाबसाहेब वाकळे, उपमहापौर मालन ढोणे, सेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, गणेश कवडे, अनिल शिंदे, सुरेखा कदम आदी उपस्थित होते. या बैठकीत नगर शहरातील कै. बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाच्या इमारत व सावेडी नाट्यगृहासाठी निधी देण्याची मागणी करण्यात आली. त्यावर दोन्ही वास्तूंसाठी प्रत्येकी पाच कोटी, असे दहा कोटी रुपयांच्या निधीला मंत्री शिंदे यांनी मंजुरी दिली. सावेडी उपनगरातील नाट्यगृहाच्या इमारतीचे काम निधीअभावी रखडले आहे. या कामासाठी निधी मंजूर करण्यात आला.
शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी नगर शहरास्ल रस्ते, ड्रेनेज उद्याने आदी कामांसाठी निधी देण्याची मागणी केली. या कामांसाठी शासनाच्या वैशिष्टपूर्ण योजनेतून नगर शहराच्या विकासाठी दिली जाईल. त्यासाठीचा सविस्तर प्रस्ताव तयार करून तो नगरविकास विभागाला पाठविण्याच्या सूचना मंत्री शिंदे यांनी केल्या.
.....
निधी मिळत नसल्याच्या नगरसेवकांच्या तक्रारी
महापालिकेकडून नगरसेवकांना निधी मिळत नाही. निधी वाटपात महापौरांकडून दुजाभाव केला जातो. त्यामुळे प्रभागातील विकास कामांना निधी उपलब्ध होत नाही, अशी तक्रार सेनेच्या नगरसेवकांनी केली. विशेष म्हणजे महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या उपस्थित ही तक्रार करण्यात आली.
....
छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास परवानगी देण्याच्या सूचना
येथील प्राेफेसर चौकात छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसविण्यास परवानगी देण्याची मागणी सेनेच्या नगरसेवकांनी मंत्री शिंदे यांच्याकडे केली. महापालिकेने पुतळा तयार केला आहे. परंतु, त्यास प्रशासकीय मंजुरी नसल्याची बाब नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी मंत्री शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच माळीवाडा येथे महात्मा फुले यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यास परवानगी देण्याची मागणी बोराटे यांनी केली. त्यावर दोन्ही पुतळ्यांना परवानगी देण्याच्या सूचना शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केल्या.
...
महापौरांकडून ७५ कोटींची मागणी
महापौर बाबासाहेब वाकळे यांनी नगर शहरातील विविध कामांसाठी ७५ कोटी रुपये देण्याची मागणी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. सावेडी उपनगरातील भिस्तबाग चौक ते श्रीराम चौक, पारिजात चौक ते एकवीरा चौक आदी रस्त्यांच्या कॉक्रिटीकरासाठी वाकळे यांनी निधीची मागणी केली.