कोपरगावातील दहा जणांचे अहवाल निगेटिव्ह, सात जणांच्या अहवालाची प्रतिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2020 05:49 PM2020-04-12T17:49:05+5:302020-04-12T17:59:06+5:30

कोपरगाव : कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर येथील एक महिला कोरोनाबाधित सापडल्याने प्रशासनाने त्या महिलेच्या कुटुंबातील तसेच इतर अशा एकूण १७ लोकांना नगर येथे तपसणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी १० जणांचे अहवाल आज प्राप्त झाले असून त्या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे कोपरगावकरांचा जीव भांड्यात पडला आहे. आणखी सात जणांच्या अहवालाची अद्याप प्रतिक्षा आहे.

 Ten of Kopargaon's reports are negative, waiting for seven's report | कोपरगावातील दहा जणांचे अहवाल निगेटिव्ह, सात जणांच्या अहवालाची प्रतिक्षा

कोपरगावातील दहा जणांचे अहवाल निगेटिव्ह, सात जणांच्या अहवालाची प्रतिक्षा

कोपरगाव : कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर येथील एक महिला कोरोनाबाधित सापडल्याने प्रशासनाने त्या महिलेच्या कुटुंबातील तसेच इतर अशा एकूण १७ लोकांना नगर येथे तपसणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी १० जणांचे अहवाल आज प्राप्त झाले असून त्या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे कोपरगावकरांचा जीव भांड्यात पडला आहे. आणखी सात जणांच्या अहवालाची अद्याप प्रतिक्षा आहे.
नगर येथील जिल्हा रुग्णालयातून कोपरगावच्या १७ जणांच्या स्त्रावांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले होते. त्यापाकी १०जणांचा अहवाल प्रशासनाला आज प्राप्त झाला. त्या सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आणखी तास जणांचा अहवाल यायचा आहे, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाते यांनी दिली. 
लक्ष्मीनगर येथील कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कात आलेल्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने कोपरगावकरांचा जीव भांड्यात पडला आहे. ती महिला कोरोनाबाधित आढळल्याने संपूर्ण कोपरगावात दक्षता घेण्यात आली होती. तसेच संपूर्ण कोपरगाव तीन दिवस लॉकडाऊन करण्यात आले होते. लॉकडाऊनची सध्या कठोरपणे अंमलबजावणी सुरू आहे. पोलिस प्रशासन रस्त्यावर असल्याने कोणीही घराबाहेर पडत नाही. रस्त्यांवरही अभूतपूर्व शुकशुकाट आहे.
         
Web Title:  Ten of Kopargaon's reports are negative, waiting for seven's report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.