पिता-पुत्राच्या दुहेरी खून खटल्यातील दहा आरोपींना जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 05:44 PM2018-05-10T17:44:04+5:302018-05-10T17:44:32+5:30
जामखेड तालुक्यातील काटेवाडी येथील जमिनीच्या वादातून पिता-पुत्राच्या दुहेरी खून प्रकरणातील दहा आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
अहमदनगर : जामखेड तालुक्यातील काटेवाडी येथील जमिनीच्या वादातून पिता-पुत्राच्या दुहेरी खून प्रकरणातील दहा आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत देशपांडे यांनी आज खटल्याचा निर्णय दिला.
जन्मठेप झालेल्यांंमध्ये महादेव गहिनीनाथ बहीर, सुखदेव रघुनाथ बहीर, शहाजी रघुनाथ बहीर, मल्हारी कैलास बहीर, दादा किसन बहिर, राजेंद्र महादेव बहिर, रघुनाथ साहेबराव बहीर, कैलास तात्या बा बहीर, सोमनाथ उध्दव बहिर, संदिप गणपत बहीर ( सर्व राहणार- काटेवाडी. ता. जामखेड) यांचा समावेश आहे.
आसाराम यशवंत बहीर यांचे जमीनीबाबत भावकीत वाद होते. या वादातून २०१४ मध्ये आसाराम बहीर व त्यांचा मुलगा नितीन बहीर या दोघांचा ३२ जणांसह इतरांनी हल्ला केला होेता. त्यामध्ये आसाराम, त्यांची पत्नी गयाबाई, मुलगा नितीन जखमी झाला होता. दवाखान्यात नेईपर्यत पिता-पुत्राचा मृत्यू झाला. याबाबत मुलगा बापूसाहेब बहीर याने फिर्याद दाखल केली होती. पोलीस तपासानंतर आरोपींविरुध्द पोलीसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे एकूण १४ साक्षीदास तपासण्यात आले. यामध्ये दोषी आढळलेल्या १० आरोपी दोषी आढळले.