केडगाव तोडफोडप्रकरणी संभाजी कदमसह दहा जण अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 01:06 PM2018-05-29T13:06:12+5:302018-05-29T13:06:55+5:30
केडगाव तोडफोडप्रकरणी दाखल गुन्ह्यातील शिवसेनेचे माजी शहर प्रमुख संभाजी कदम यांच्यासह दहा जण आज कोतवाली पोलीस ठाण्यात हजर झाले.
अहमदनगर: केडगाव तोडफोडप्रकरणी दाखल गुन्ह्यातील शिवसेनेचे माजी शहर प्रमुख संभाजी कदम यांच्यासह दहा जण आज कोतवाली पोलीस ठाण्यात हजर झाले.
केडगाव येथे शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांची हत्या झाल्यानंतर संतप्त जमावाने घटनास्थळी तोडफोड केली होती. याप्रकरणी सहाय्यक फौजदार लक्ष्मण हंडाळ यांनी दिलेल्या फियार्दीवरून माजी आमदार अनिल राठोड यांच्यासह इतर ६०० जणांवर गुन्हा दाखल झाला होता. या आधी पोलीसांनी ३२ शिवसैनिकांना अटक केली होती. त्यांना जामीन मिळाला आहे. त्यानंतर दहा शिवसैनिक आज पोलीस ठाण्यात हजर झाले.