राहुरी तहसील कार्यालयातूृन दहा वाळूच्या वाहनांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 04:24 PM2018-04-21T16:24:42+5:302018-04-21T16:25:13+5:30
कडक पोलीस बंदोबस्तात असलेल्या राहुरी तहसील कार्यालयाच्या बंदिस्त आवारातील चक्क १० वाळूची वाहने चोरीस गेली. जप्त केलेली वाहने किती असुरक्षित आहे याची प्रचिती यानिमित्ताने आली.
राहुरी : कडक पोलीस बंदोबस्तात असलेल्या राहुरी तहसील कार्यालयाच्या बंदिस्त आवारातील चक्क १० वाळूची वाहने चोरीस गेली. जप्त केलेली वाहने किती असुरक्षित आहे याची प्रचिती यानिमित्ताने आली. राहुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून वाहने चोरीस जाण्यामागे नेमका हात कुणाचा आहे? याची चर्चा रंगली आहे.
राहुरी महसूल विभागाने १० जुलै २०१७ ते १९ एप्रिल २०१८ यादरम्यान ४ डंम्पर,दोन ट्रॅक्टर, एक ट्रक व ३ टेम्पो महसूल विभागाने पकडले होते. मुळा व प्रवरा नद्यांच्या पात्रात पकडलेली ही वाहने राहुरी तहसील व पोलीस स्टेशनच्या आवारात उभी करण्यात आली होती. पकडलेली वाहने चोरीस गेल्याचे लक्षात येताच महसूल विभागाचे लिपीक श्रीकृष्ण सावळे यांनी राहुरी पोलीस स्टेशनमध्ये फि र्याद दाखल केली. पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरीस गेलेली वाहने, त्यांचे क्रमांक व मालकाचे नाव पुढीलप्रमाणे-ट्रॅक्टर एम.एच.-१७, बी.डी.-५३६ मालक-उत्तम बर्डे (रा.ताहाराबाद). नितीन मकासरे (रा. तांदुळवाडी) ट्रॅक्टर क्रमांक एम. एच. १७, ए.व्ही. ३६११, संकेत चेमटे (रा. अहमदनगर) डंम्पर क्रमांक एम. एच.१६, बी.सी.१५५०, महेश सोनवणे (रा. चिंचोली) ट्रक एम. एच. ४१, जी. ६९९७. नितीन भांबळ (रा. देहेरे) डंम्पर एम.एच.-२०, बी. टी. १४९. श्रीकांत चांदवे (रा. देहेरे) एम. एच. ए. ई.-९३९७, प्रवीण म्हसे (रा. राहुरी खुर्द) एम. एच.-१४, ए. एस. ७२४६, रोहिदास करंडे (रा. देहेरे) एम. एच.२०, ए.टी.एस. ५७४६, प्रमोद कराळे एम. एच. १६, ए. टी. २५२६, उमेश भालेराव (रा. तांदुळवाडी) एम.एच.०४, सी. यू २४३२.
तहसील कचेरीसमोर वाहने लावण्यात आली होती़ महसूल पथकाने ही वाहने नदीपात्रातून पकडली होती़ दहा वाहन चालकांना आदेश होईपर्यंत वाहने घेऊन जाऊ नये असा समन्स बजावण्यात आला होता़ चोरीस गेलेल्या वाहानांची किंमत ४५ लाख रूपये आहे़
-श्रीकृष्ण सावळे, लिपिक, राहुरी तहसील कचेरी.