पोलीस बंदोबस्तात दीडशे टँकर जिल्ह्याबाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 11:24 AM2018-07-18T11:24:22+5:302018-07-18T11:25:02+5:30
स्वाभिामानी शेतकरी संघटनेच्या दूध बंद आंदोलनाला दुसऱ्या दिवशी मंगळवारी जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. सकाळच्या सत्रात ३ लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून, पोलीस बंदोबस्तात १५० टँकर जिल्ह्याबाहेर पाठविले आहेत.
अहमदनगर : स्वाभिामानी शेतकरी संघटनेच्या दूध बंद आंदोलनाला दुसऱ्या दिवशी मंगळवारी जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. सकाळच्या सत्रात ३ लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून, पोलीस बंदोबस्तात १५० टँकर जिल्ह्याबाहेर पाठविले आहेत.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारपासून दूध बंद आंदोलन पुकारले आहे. जिल्ह्यात प्रभात, राजहंस, गोदावरी, अकोले, कोपरगाव आदी प्रमुख दूध संघ आहेत. या दूध संघांनी सोमवारी दूध संकलन बंद ठेवले होते. त्यामुळे २४ लाख लिटर दूध जागेवरच राहिले. दुस-या दिवशी मंगळवारी मात्र संगमनेर, श्रीरामपूर, राहुरी, नेवासा, पाथर्डी तालुक्यांतील दूध संघांनी दुधाचे संकलन केले. नगर जिल्ह्यातून पुणे, नाशिकमार्गे मुंबईला, तर श्रीरामपूरमागे मराठवाड्यात दूध पुरवठा होतो. पोलीस बंदोबस्तात १५० टँकर जिल्ह्याबाहेर पाठविले असून, मराठवाड्यातून आलेले शासकीय दूध योजनेचे दोन टँकर पुणेमार्गे पोलीस बंदोबस्तात मुंबईला रवाना करण्यात आले. कर्जत, जामखेड आणि श्रीगोंदा तालुक्यांतील दूध संकलन दुस-या दिवशी मंगळवारी बंद होते. संगमनेर, श्रीरामपूर, राहुरी, नेवासा तालुक्यांतील दूध संघांनी दुधाचे संकलन केले.
५० जणांवर कारवाई
दूध संकलनात अडथळा येत असल्याने जिल्ह्यातील ५० दूधउत्पादक शेतकºयांवर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली. तसेच सात जणांना अटक करण्यात आली आहे.
जिल्ह्यात सकाळच्या सत्रात तीन लाख लिटर दुधाचे संकलन झाले आहे. दूध संघांना पोलीस संरक्षण दिले असून, पोलीस बंदोबस्तात टँकर पाठविले आहेत. -व्ही.एन. नारखेडे,जिल्हा दुग्ध विकास अधिकारी