नेवासा फाटा येथे दुचाकीला कट मारल्यामुळे तणाव; पोलिसांच्या मध्यस्थीनंतर मिटल वाद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 01:46 PM2018-01-08T13:46:43+5:302018-01-08T13:47:56+5:30

येथे दुचाकीवरुन जात आसलेल्या युवकाला कट मारुन त्या युवकालाच एका गटाने दमबाजी केल्याने वाद झाला. यामुळे दोन गट आमने-सामने आले़ त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. याची माहिती मिळताच नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रविण लोखंडे घटनास्थळी पोहोचले.

Tension due to cut off a bike at Nevada Phata; After the mediation of the police, the Middles! | नेवासा फाटा येथे दुचाकीला कट मारल्यामुळे तणाव; पोलिसांच्या मध्यस्थीनंतर मिटल वाद!

नेवासा फाटा येथे दुचाकीला कट मारल्यामुळे तणाव; पोलिसांच्या मध्यस्थीनंतर मिटल वाद!

नेवासा फाटा : येथे दुचाकीवरुन जात आसलेल्या युवकाला कट मारुन त्या युवकालाच एका गटाने दमबाजी केल्याने वाद झाला. यामुळे दोन गट आमने-सामने आले़ त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. याची माहिती मिळताच नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रविण लोखंडे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी मध्यस्थी करीत जमावाला पांगविले व वादावर पडदा टाकला़ ही घटना सोमवारी सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान घडली.
नेवासा फाटा रोडवरुन नेवाशाकडे दुचाकीवरुन चाललेल्या एका युवकाला पाठीमागून येणा-या युवकाने शिवाजीनगर परिसरात कट मारला. याचा जाब विचारण्यास गेलेल्या या युवकाला वायररोप काढून मारहाण करण्याचा प्रयत्न कट मारणा-या युवकाने केला. त्यामुळे दोघांचे गट एकमेकांसमोर उभे ठाकले. त्यामुळे वाहतू कोंडी झाली. याची माहिती मिळताच अवघ्या पाच मिनिटात नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रविण लोखंडे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जमावाला पांगवून दोन गटातील वाद मिटविला.
दोन्ही गटातील वाद मिटल्यानंतर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. नेवासा फाटा व परिसरात दोन गटातील किरकोळ वादातून मोठ्या घटना घडल्याची अनेक उदाहरणे ताजे असतानाच सोमवारी सकाळी हा प्रकार घडला. पोलिसांनी प्रसंगावधान राखत वेळीच हस्तक्षेप केला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला, अशी चर्चा बघ्यांमध्ये यावेळी रंगली होती.

Web Title: Tension due to cut off a bike at Nevada Phata; After the mediation of the police, the Middles!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.