राहुरीत दहाव्यात वाटली १६०० रोपे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2019 12:38 PM2019-10-06T12:38:43+5:302019-10-06T12:40:02+5:30
ज्येष्ठ समाजसेविका भागुबाई धोंडीराम येवले यांच्या दशक्रिया विधीनिमित्त पर्यावरण पूरक उपक्रम राबविण्यात आला़ उपस्थितांना १ हजार ६०० वृक्षांची रोपे देऊन पर्यावरण जागृतीचा संदेश देण्यात आला़ प्रत्येकाने श्रध्दांजली म्हणून रोपे नेऊन त्याचे संगोपन करावे, असे आवाहन करण्यात आले़
राहुरी : ज्येष्ठ समाजसेविका भागुबाई धोंडीराम येवले यांच्या दशक्रिया विधीनिमित्त पर्यावरण पूरक उपक्रम राबविण्यात आला़ उपस्थितांना १ हजार ६०० वृक्षांची रोपे देऊन पर्यावरण जागृतीचा संदेश देण्यात आला़ प्रत्येकाने श्रध्दांजली म्हणून रोपे नेऊन त्याचे संगोपन करावे, असे आवाहन करण्यात आले़
आदर्श माता व ज्येष्ठ समाजसेविका भागुबाई धोंडीराम येवले यांचा दशक्रिया विधीचे औचित्य साधून १६०० रोपांचे वाटप करण्यात आले़ प्रत्येकाने वृक्ष संवर्धन केले तर पर्यावरणाचा समतोल साधून पशु पक्ष्यांसह मानवाला सुख समृध्दी लाभण्यास मदत होईल असे संजय महाराज म्हसे यांनी प्रवचनातून सांगितले़
मल्हारवाडी येथील पार्वतीबाई हरिभाऊ जाधव यांना आदर्श माता भागुबाई येवले यांच्या स्मरणार्थ स्मृतिचिन्ह, रोप, साडी, चोळी देऊन द्रौपदाबाई घोरपडे व सोनूबाई राजुळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़ दहाव्याच्या दिवशी रोपे वाटून स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल माजी नगराध्यक्षा डॉ़ उषाताई तनपुरे यांनी कौतुक केले़
आमदार शिवाजी कर्डिले, माजी खासदार प्रसाद तनपुरे, प्रा़अनिता राजुळे, नगरसेवक बाळासाहेब गांगड, पतंजलीचे जिल्हा प्रभारी प्रा़बाळासाहेब निमसे, मधुकर निकम, संजय
कुलकर्णी, संभाजीराजे तनपुरे, राजेश मंचरे, अनिल येवले यांनी
भागुबाई येवले यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करून आदरांजली अर्पण केली़
मातोश्री येवले यांच्या सामाजिक कार्यातून उपस्थितांना प्रेरणा मिळावी म्हणून मुलगी ताराबाई निमसे, मीना राजुळे, मुले दत्तात्रय येवले, रावसाहेब येवले, भाऊसाहेब येवले, बाबासाहेब येवले यांनी विधायक उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला़
स्तुत्य उपक्रम
भागुबाई येवले यांची रक्षा पेरू, जांभळ, कपाशी व ऊस पिकात टाकून स्तुत्य उपक्रम राबविला़ दीड महिन्यापूर्वी भागुबाई येवले यांच्या हस्ते २०० जांभळीची झाडे लावण्यात आली होती़ तीन वर्षानंतर जांभळापासून उत्पादन सुरू झाल्यानंतर त्याचा उपयोग सामाजिक कामासाठी करण्याचा निर्णय येवले परिवाराने घेतला आहे़ तेराव्या दिनाचे औचित्य साधून येवले परिवाराच्या वतीने विज्ञानातून अंधश्रध्दा निर्मूलनाचे प्रयोग अरूण तुपविहीरे व डोंगरे यांनी सादर केले़ यावेळीही उपस्थितांना रोपांचे वितरण करण्यात आले़