तेरे जैसा यार कहा... पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे गाणे सोशल मीडियावर सुपरहीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2020 04:00 PM2020-04-20T16:00:23+5:302020-04-20T16:01:02+5:30
सध्याच्या ताण-तणावातून मनाला शांती विरंगुळा मिळावा म्हणून पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव हे कामाच्या व्यस्ततेतून वेळ काढून हिंदी, मराठी गाणे गाण्याचा आनंद लुटत आहेत. जाधव यांचे ‘तेरे जैसा यार कहा’ हे गाणे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे.
श्रीगोंदा : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंद्यात संचारबंदी आदेशाचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव व त्यांच्या टीमने जबरदस्त कामगिरी चालविली आहे. सध्याच्या ताण-तणावातून मनाला शांती विरंगुळा मिळावा म्हणून पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव हे कामाच्या व्यस्ततेतून वेळ काढून हिंदी, मराठी गाणे गाण्याचा आनंद लुटत आहेत. जाधव यांचे ‘तेरे जैसा यार कहा’ हे गाणे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे.
नगर जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्हचे २९ रुग्ण सापडले. मात्र श्रीगोंद्याचे तहसीलदार महेंद्र महाजन, पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, अरविंद माने, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन खामकर यांच्या टीमने डोळ्यात तेल घालून कोरानाचा श्रीगोंद्यात शिरकाव होऊ दिला नाही.
संचारबंदी काळात राजकिय नेत्यांनी घरात राहून आपले छंद जोपासण्याचे काम चालविले आहे. पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांना गाण्याची प्रचंड आवड आहे. त्यामुळे ते त्यांच्या कामाच्या व्यस्ततेतून वेळ मिळाल्यानंतर हाती माईक घेत अधून-मधून गाण्यांची मैफल रंगवत आहेत. श्रीगोंद्याचे सुनील तुकाराम दरेकर, अनिल ननवरे, चिंभळे येथील डॉ. सुनील जाधव हे गाण्याचा छंद जोपासत आहेत. श्रीगोंद्याचे हमीद सय्यद, काष्टीचे गुलाब तांबोळी हे अंभगाच्या मैफलीत दंग झालेले आहेत.
संचारबंदीच्या काळात कामाचा ताण वाढला आहे. पण नैतिक जबाबदारी आणि जाणिवेतून कोरोनापासून नागरिकांचे रक्षण करण्यासाठी काम करत आहे. त्यातून थोडासा विरंगुळा व्हावा म्हणून संगीताशी नाते जोडले आहे, अशी भावना पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी व्यक्त केली.