संगमनेर तालुक्यात दहशतवादी हल्ल्याचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 12:59 PM2019-02-16T12:59:10+5:302019-02-16T12:59:19+5:30
पुलवामा येथील दहशतवादी आत्मघाती हल्ल्याचा संगमनेर तालुक्यातील शिवशाही युवा प्रतिष्ठाण, साईरत्न प्रतिष्ठाण व पठारभागतील ग्रामस्थांनी एकत्र येत निषेध नोंदविला.
घारगाव : पुलवामा येथील दहशतवादी आत्मघाती हल्ल्याचा संगमनेर तालुक्यातील शिवशाही युवा प्रतिष्ठाण, साईरत्न प्रतिष्ठाण व पठारभागतील ग्रामस्थांनी एकत्र येत निषेध नोंदविला.
संगमनेर तालुक्यातील घारगावमध्ये शनिवारी सर्व व्यापा-यांनी दुकाने बंद ठेवली असून कडकडीत बंद पाळला जात आहे. दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली. पठारभागात शाळा महाविद्यालयांसह सार्वजनिक स्थळी श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवशाही व साईरत्न प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी सकाळी घारगाव चौकात पाकिस्तानचा प्रधानमंत्री इमरान खान याचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. तसेच भारतमातेची आरती करून शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. याप्रसंगी सरपंच अर्चना आहेर, रेखा चोपडा, उपसरपंच राजेंद्र कान्होरे, मनसेचे उपजिल्हाध्यक्ष किशोर डोके, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब ढोले, राष्ट्रवादीचे गणेश लेंडे, बोरबनचे उपसरपंच संदेश गाडेकर, संदीप आहेर, घारगाव सोसायटीचे अध्यक्ष नामदेव गाडेकर, राजेंद्र आहेर, नितीन आहेर, रमेश आहेर, गणेश आहेर, वाल्मिक आहेर, विकास मते, संजय वाघ, अशोक पाडेकर, राहुल आहेर, सर्जेराव ढमढेरे, संतोष घाटकर, गणेश भोसले, संतोष कान्होरे, हारून शेख उपस्थित होते.