उपोषणकर्त्या बापाची प्रकृती ढासाळली; लेकीला अश्रू अनावर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 07:51 AM2023-09-25T07:51:52+5:302023-09-25T07:52:16+5:30

सरकारने आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी तिने केली.

The father was on fast and the daughter was in tears | उपोषणकर्त्या बापाची प्रकृती ढासाळली; लेकीला अश्रू अनावर

उपोषणकर्त्या बापाची प्रकृती ढासाळली; लेकीला अश्रू अनावर

लोकमत न्यूज नेटवर्क
जामखेड (जि. अहमदनगर) : धनगर समाज आरक्षणासाठी चोंडी येथे गेल्या १९ दिवसांपासून उपोषण सुरू आहे. येथील प्रकृती खालावलेले उपोषणकर्ते सुरेश बंडगर यांच्या मुलीने रविवारी दुपारी उपोषणस्थळी भेट दिली. वडिलांची अवस्था पाहून तिला अश्रू अनावर झाले. सरकारने आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी तिने केली.

उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली
मिरी (जि. अहमदनगर) : धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे यासाठी सामाजिक कार्यकर्ते राजू तागड व बाळासाहेब कोळसे यांनी मिरी (ता. पाथर्डी) येथील वीरभद्र मंदिराशेजारी उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या सातव्या दिवशी शनिवारी रात्री नऊ वाजता अचानक तब्येत बिघडल्याने राजू तागड यांना आमदार प्रा. राम शिंदे यांनी नगर  जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

Web Title: The father was on fast and the daughter was in tears

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.