जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंक निवडणूक स्थगिती उच्च न्यायालयाने उठवली
By साहेबराव नरसाळे | Published: September 26, 2022 02:24 PM2022-09-26T14:24:08+5:302022-09-26T14:24:34+5:30
शिक्षक परिषद व गुरूमाऊलीच्या याचिकेवर उच्च न्यायालयाचे आदेश
अहमदनगर : अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बॅंकेची निवडणूक स्थगिती औरंगाबाद उच्च न्यायालयाकडून उठवली. १६ ऑक्टोबर रोजी मतदान तर १७ ऑक्टोबर रोजी मतमोजणीचे घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या
न्यायमूर्ती रविंद्र घुगे व न्यायमूर्ती अर्जुन पेडणेकर यांच्या खंडपीठाने सहकार विभागाला दिले.
शिक्षक बँकेच्या निवडणूकीवरील स्थगिती उठवून निवडूक वेळेत घेण्यात यावी यासाठी रोहोकले गुरुजी प्रणित गुरुमाऊली मंडळाच्य १३० कार्यकर्त्यांनी लोकवर्गणीतून उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात ८८८६ क्रमांकाची याचिका याचिकाकर्ते जिल्हाध्यक्ष प्रविण ठुबे, गणेश वाघ गुरुजी, विकास डावखरे, दशरथ ढोले, संतोष खामकर व इतर यांच्या नावाने दाखल करण्यात आलेली होती.
औरंगाबाद खंडपीठात आज सोमवार दि.२६ सप्टेंबर रोजी न्यायमूर्ती रविंद्र घुगे व न्यायमूर्ती अर्जुन पेडणेकर यांचे समोर सुनावणी झाली. निवडणूक ज्या टप्प्यावर स्थगित करण्यात आली होती, त्याच टप्प्यावर पुन्हा सुरू करुन मतदान प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. निवडणूक आहे त्याच टप्प्यावर घेण्याबाबत आग्रही मागणी याचिकाकर्ते वकिल ॲड. गुलाबराव राजळे आणि ॲड. राजेंद्र टेमकर यांच्या मार्फत आजच्या सुनावणी दरम्यान करण्यात आली, अशी माहिती ठुबे यांनी लोकमतला दिली.
वेगवेगळ्या चढ उतारांत सत्य, विश्वासार्हता आणि प्रामाणिक विचारांची साथ करणाऱ्या सर्वसामान्य शिक्षकांचे हे यश असल्याची प्रतिक्रिया शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे यांनी दिली.