व्यापाऱ्याचा एक लाखांचा ऐवज लुटला; दुचाकी पळवली, बेदम मारहाण, श्रीरामपुरातील घटना

By शिवाजी पवार | Published: June 19, 2023 05:14 PM2023-06-19T17:14:45+5:302023-06-19T17:14:54+5:30

रांजणखोल चौकामध्ये दोघा चोरट्यांनी खोसे यांना अडविले. त्यांच्या दुचाकीवर बसून गाडी टिळकनगर कारखान्याकडे घेण्यास सांगितले.

The merchant was robbed of one lakh; Two-wheeler stolen, brutally beaten, incident in Srirampur | व्यापाऱ्याचा एक लाखांचा ऐवज लुटला; दुचाकी पळवली, बेदम मारहाण, श्रीरामपुरातील घटना

व्यापाऱ्याचा एक लाखांचा ऐवज लुटला; दुचाकी पळवली, बेदम मारहाण, श्रीरामपुरातील घटना

श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : दुचाकीवरून जाणाऱ्या व्यापाऱ्याला चाकू लावून त्याच्या गळ्यातील सोन्याची चेन आणि २० हजार रुपयांची रोकड तिघा चोरट्यांनी लुटली. व्यापाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेलापूर येथील व्यापारी बाळकृष्ण गोविंद खोसे (वय ६४) यांनी फिर्याद नोंदविली आहे. रविवारी ते दुकानातील माल आणण्यासाठी राहाता येथे गेले होते. तेथून दुपारी टिळकनगरहून बेलापूरकडे जात असताना हा प्रकार घडला.

रांजणखोल चौकामध्ये दोघा चोरट्यांनी खोसे यांना अडविले. त्यांच्या दुचाकीवर बसून गाडी टिळकनगर कारखान्याकडे घेण्यास सांगितले. तेथे त्यांचा आणखी एक साथीदार आला. तिघांनी खोसे यांच्याकडील २० हजार रुपये तसेच सोन्याची चेन असा एक लाख रुपयांचा मुद्देमाल काढून घेतला. खोसे यांना बेदम मारहाण केली. मारामारी दरम्यान खोसे यांनी आरडाओरड सुरू केली. त्यामुळे तिघा चोरट्यांनी खोसे यांच्या दुचाकीवरून तेथून पळ काढला. खोसे यांनी पोलिसांना चोरट्यांची माहिती दिली आहे. पोलिस त्यांचा शोध घेत आहे.

Web Title: The merchant was robbed of one lakh; Two-wheeler stolen, brutally beaten, incident in Srirampur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.