जामखेड दुहेरी हत्याकांडाचा आज निकाल, राजकीय वर्चस्वातून झाली होती हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 11:59 AM2022-12-28T11:59:01+5:302022-12-28T12:00:02+5:30

आरोपीत 14 जणांचा समावेश

The result of Jamkhed double murder today the murder was due to political dominance | जामखेड दुहेरी हत्याकांडाचा आज निकाल, राजकीय वर्चस्वातून झाली होती हत्या

जामखेड दुहेरी हत्याकांडाचा आज निकाल, राजकीय वर्चस्वातून झाली होती हत्या

बाळासाहेब काकडे

अहमदनगर : राजकीय वर्चस्वादातून पोस्टर फाडल्याचा राग मनात धरून जामखेड शहरात योगेश राळेभात व राकेश राळेभात या दोन तरुणांची पिस्तुलातून गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या बहुचर्चित खटल्याची सुनावणी पूर्ण झाली असून, बुधवारी (दि. 28) श्रीगोंदा येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सदर खटल्याचा अंतिम निकाल आहे. या गुन्ह्यात तब्बल 14 आरोपी आहेत.
 
दि. 28 एप्रिल, 2018 रोजी ही घटना घडली होती. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या खटल्यात राज्य शासनाने विशेष सरकारी वकील म्हणून उमेशचंद्र यादव-पाटील यांची नियुक्ती केली आहे. श्रीगोंदा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. जी. शुक्ला यांच्यासमोर सदर खटल्याची सुनावणी झाली. 

जामखेड शहरात दोन राजकीय गटात अनेक वर्षांपासून वर्चस्वाची लढाई सुरू होती. राजकीय शुभेच्छाचा पोस्टर फाडल्याच्या रागातून सायंकाळच्या समावेश एका हॉटेलात योगेश राळेभात व राकेश राळेभात या दोघांची पिस्तुलातून गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे जामखेडसह संपूर्ण नगर जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघाले होते. राजकीय वर्चस्वाचे रूपांतर दुहेरी हत्येपर्यंत झाल्याने मोठीच खळबळ माजली होती.

पोलिसांनी सदर गुन्ह्यात गोविंद दत्तात्रय गायकवाड, विजय आसाराम सावंत, उल्हास विलास माने, कैलास विलास माने, प्रकाश विलास माने, काका बबन गर्जे, दत्ता रंगनाथ गायकवाड, सचिन गोरख जाधव, विनोदकुमार सोमारिया रमिश, अशोक जाधव, अंकुश पप्पू कात्रजकर, गोरख दत्तात्रय गायकवाड, युवराज अभिमन्यू जाधव, धनाजी धनराज जाधव यांच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. तत्कालीन पोलीस उपधीक्षक सुदर्शन मुंडे हे सदर गुन्ह्याचे तपासी अधिकारी होते.

खटल्यात सरकारी पक्षाने प्रत्यक्षदर्शीसह पोलीस अधिकारी आदी एकूण 32 साक्षीदारांची तपासणी केली. बचाव पक्षाने एकूण पाच साक्षीदार तपासले. राजकीय वर्चस्व वादातून हे दुहेरी हत्याकांड झाल्यामुळे या खटल्याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सरकारी पक्षाच्यावतीने विशेष सरकारी वकील ॲड. उमेशचंद्र यादव पाटील यांनी 17 ऑक्टोबर 2022 रोजी अंतिम लेखी युक्तिवाद न्यायालयासमोर मांडला. सदर खटल्याची सुनावणी पूर्ण झाली असून, धुपारी अंतिम निकाल आहे.

Web Title: The result of Jamkhed double murder today the murder was due to political dominance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.