लय भारी! नवरा-बायको बनले क्लास १ अधिकारी, MPSC परीक्षेतून गगनभरारी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2023 09:13 PM2023-01-28T21:13:45+5:302023-01-28T21:15:13+5:30

एमपीएससीमार्फत वर्ष 2019, 2020 मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पती-पत्नी एकाच वर्षी उत्तीर्ण झाले आहेत.

The rhythm is heavy! Husband-Wife-turned-officer, skyrocketing success in MPSC exam | लय भारी! नवरा-बायको बनले क्लास १ अधिकारी, MPSC परीक्षेतून गगनभरारी

लय भारी! नवरा-बायको बनले क्लास १ अधिकारी, MPSC परीक्षेतून गगनभरारी

अहमदनगर- स्पर्धा परीक्षा म्हणजे आता जुगार झालाय असं काहीसा सूर अनेक विद्यार्थ्यांमध्ये आहे. अर्थातच, ३ ते ४ लाख विद्यार्थ्यांमधून ५०० ते १००० विद्यार्थ्यांनाच नोकरी मिळते. त्यामुळे, या स्पर्धा परीक्षांतील स्पर्धा आणि संघर्ष टोकाचा बनल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांमध्ये उमटते आहे. मात्र, मेहनत, जिद्द आणि अभ्यासातील सातत्य ठेवल्यास स्पर्धा परीक्षांत यश मिळतेच, हेच दाखवून दिलंय एका नवविवाहित जोडप्याने. अहमदनगर जिल्ह्यातील सुरेश आणि मेघना चासकर यांची एमपीएससी स्पर्धेतील क्लासवन पदी निवड झाली आहे. नुकताच या परीक्षेचा निकाल लागला. 

एमपीएससीमार्फत वर्ष 2019, 2020 मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पती-पत्नी एकाच वर्षी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे लग्नानंतरही या दोघांनी स्पर्धा परीक्षांची तयारी सुरूच ठेवली होती. अखेर, प्रामाणिक प्रयत्नाला यश मिळालं असून दोघेहीही इंजिनिअर आता सरकारी विभागात अधिकारी बनली आहेत. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षेतून या दोघांनीही सार्वजनिक बांधकाम विभागात क्लास वन अधिकारी पदाला गवसणी घातली. पती-पत्नीने एकाचवेळी मिळविलेल्या या यशाबद्दल त्यांचं अभिनंदन आणि कौतुक होत आहे.

सुरेश व मेघना हे दोन्ही मे 2022 मध्ये विवाहबंधनात अडकले. तत्पूर्वीच त्यांनी ही परीक्षा दिली होती. लग्नानंतर एक वर्षाच्या आतच दोघेही क्लासवन अधिकारी बनले आहेत. मेघना यांचे मूळ गाव कोपरगाव तालुक्यातील येसगाव आहे. तर, सुरेश हे सिन्नर तालुक्यातील सायाळ्याचे रहिवाशी आहेत. कोपरगाव येथील संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयातून दोघांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. कुटुंबांचे पाठबळ व एकमेकांची साथ असल्यानेच त्यांचे अधिकारी होण्याचे स्वप्न सत्यात उतरले आहे. 

Web Title: The rhythm is heavy! Husband-Wife-turned-officer, skyrocketing success in MPSC exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.