नगरच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी समजावून घेतल्या कोठेवाडीतील ग्रामस्थांच्या समस्या
By अरुण वाघमोडे | Published: August 11, 2023 04:33 PM2023-08-11T16:33:46+5:302023-08-11T18:23:45+5:30
आदिवासी वाड्यांवर योजना पोहोचल्यात का? जाणून घ्या सत्य
अरुण वाघमोडे, अहमदनगर: साहेब गावातील रस्ते खराब झालेत, गावाचा डोंगरी विकास योजनेत समावेश करा, पाण्यासाठी तलाव व्हावा तसेच घरकुल योजना आणि आमच्या सुरक्षेसाठी पोलीस चौकी कार्यन्वित करा, अशा मागणी पाथर्डी तालुक्यातील दुर्गम भागातील कोठेवाडी ग्रामस्थांनी उपजिल्हाधिकारी बालाजी क्षीरसागर यांच्याकडे केली.
महसूल सप्ताहतंर्गत जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ व अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांच्या सूचनेनुसार उपजिल्हाधिकारी बालाजी क्षीरसागर व महसूल सहायक अशोक मासाळ यांनी चार दिवसांपूर्वी कोठेवाडी व परिसरातील आदिवासी वस्तींवर भेट देेत ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या समस्या समजावून घेतल्या. यावेळी त्यांच्या समवेत तलाठी राजू मेरड उपस्थित होते. उपजिल्हाधिकारी गावात आल्याचे समजताच ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने त्यांचे स्वागत केले. यावेळी कोठेवाडीचे सरपंच संजय चितळे यांच्यासह दत्तू कोठे, विष्णू कोठे, गोरख कोठे, मुरलीधर कोठे, किशोर पवार, गिन्यानदेव कोठे, पोलीस पाटील वसंत वाघमारे यांनी गावातील प्रश्न मांडले. गावात पोलीस चौकी करावी, डोंगरी विकास योजनेत समावेश करावा, पाझर तलाव संपादनाचे काम व्हावे, रेशनचा प्रश्न मार्गी लावावा, रस्ते व्हावेत आदी प्रश्न मार्गी लावण्याची मागगणी ग्रामस्थांनी केली. यावेळी उपजिल्हाधिकारी क्षीरसागर यांनी ग्रामस्थांसह तरुणांना मार्गदर्शन करत रोजगरासाठी कौशल्य आत्मसात करावे, महसूलस्तरावरून गावातील प्रश्न मार्गी लावण्यास प्राधन्य देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. मासाळ यांनी देखील स्थानिक युवक व ज्येष्ठांशी संवाद सात शासनाच्या योजनांबाबत माहिती दिली.
आदिवासी वाड्यांवर योजना पोहोचल्यात का?
शासनाकडून अनेक योजना राबविल्या जातात मात्र, यंत्रनेच्या माध्यमातून दुर्गम आदिवासी भागात योजना पोहोचतात की, नाही यांची माहिती उपजिल्हाधिकारी क्षीरसारग यांनी घेतली. कोठेवाडीपासून जवळ असलेल्या आदिवासी वस्तीवर त्यांनी भेट देऊन तेथील पोपट भवरे, कौशल्य भवरे, सतीश भवरे, अशोक भवरे यांच्याशी संवाद ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. वाड्यावरील झोपड्यांबाबत प्रतिबंधात्मक उपायोजना करण्याच्या सचूना यावेळी जिल्हाधिकारी क्षीरसागर यांनी तलाठी मेरड यांनी दिल्या. तसेच घरकुल योजना, संजय गांधी योजना, शिधापत्रिका, पी एम किसान व आदिवासी विकासाच्या योजना पूर्ण क्षमतेने वाडीवस्तींवर पोहोचविण्याबाबत क्षीरसागर यांनी संबंधित आधिकाऱ्यांना आदेश दिले.