संगमनेर तालुक्यात जमिनीला पडल्या भेगा; ओढ्यातील पाणीही अचानक आटले, ग्रामस्थ भयभीत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 11:20 AM2022-03-30T11:20:08+5:302022-03-30T11:20:34+5:30

भेगा पडलेल्या परिसरात असलेल्या कूपनलिकेचेही पाणी बंद झाले असल्याचे येथील ग्रामस्थ अनंथा गाडेकर यांचे म्हणणे आहे.

The villagers are terrified of the sudden land Cracking In Sangamner | संगमनेर तालुक्यात जमिनीला पडल्या भेगा; ओढ्यातील पाणीही अचानक आटले, ग्रामस्थ भयभीत

संगमनेर तालुक्यात जमिनीला पडल्या भेगा; ओढ्यातील पाणीही अचानक आटले, ग्रामस्थ भयभीत

घारगाव (जि. अहमदनगर) : संगमनेर तालुक्यातील बोरबन (सराटी) परिसरात टेकडवाडी लोक वस्तीवर जमिनीला अचानक भेगा पडल्याने येथील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. बुधवारी सकाळच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला आहे.
       
तालुक्यातील बोरबन (सराटी) टेकडवाडी येथे देविदास गाडेकर,अनिल गाडेकर,नवनाथ गाडेकर,शांताराम गाडेकर,शिवाजी गाडेकर,सोमनाथ गाडेकर, अनंथा गाडेकर आदींसह ग्रामस्थ येथे राहतात. आजूबाजूला डोंगर व  नदीपात्र काहीच अंतरावर आहे. या परिसरात ठिकठिकाणी जमिनीला भेगा पडल्या आहे. आज (बुधवारी ३० ) सकाळी हा प्रकार उघडकीस आला. भेगा पडल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.

भेगा पडलेल्या परिसरात असलेल्या कूपनलिकेचेही पाणी बंद झाले असल्याचे येथील ग्रामस्थ अनंथा गाडेकर यांचे म्हणणे आहे. याबाबत बोरबन गावचे सरपंच संदेश गाडेकर यांनी प्रशासनाला  कळविले आहे. तलाठी दादा शेख व कोतवाल शशिकांत खोंड यांनी घटनास्थळी भेट दिली. यापूर्वीही दोन वर्षापूर्वी सराटी लोकवस्ती पासून काही अंतरावर असणाऱ्या करवंदवाडी येथील काळदरा ओढ्यातील खडकाला भेगा पडून ओढ्यातील पाणी अचानक आटले होते .

याबाबत नाशिकच्या मेरी संस्थेच्या अधिकाऱ्यांशी व भूजल संरक्षण विभागाशी संपर्क केला आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये.  -अमोल निकम , तहसीलदार ,संगमनेर

Web Title: The villagers are terrified of the sudden land Cracking In Sangamner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.