युवकाच्या प्रसंगावधानानं वृद्ध दाम्पत्य बचावलं; अशी थांबवली ब्रेक फेल झालेली दुचाकी 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 11:44 PM2022-03-22T23:44:15+5:302022-03-22T23:47:56+5:30

या दाम्पत्याची ब्रेक निकामी झालेली दुचाकी एका युवकाने पळत जाऊन धरल्याने हे वृद्ध पती-पत्नी सुखरूप बचावले. या प्रसंगावधानामुळे पुढील अनर्थ टळला. 

The young man saved the old couple and The brakes failed bike stopped | युवकाच्या प्रसंगावधानानं वृद्ध दाम्पत्य बचावलं; अशी थांबवली ब्रेक फेल झालेली दुचाकी 

युवकाच्या प्रसंगावधानानं वृद्ध दाम्पत्य बचावलं; अशी थांबवली ब्रेक फेल झालेली दुचाकी 

बारामती- काळ आला होता मात्र वेळ आली नव्हती, असाच काहीसा अनुभव जंकशन (ता. इंदापूर ) येथील वृद्ध जोडप्याला आला. या दाम्पत्याची ब्रेक निकामी झालेली दुचाकी एका युवकाने पळत जाऊन धरल्याने हे वृद्ध पती-पत्नी सुखरूप बचावले. या प्रसंगावधानामुळे पुढील अनर्थ टळला. 

रियाज मुलाणी असे या धाडसी युवकाचे नाव आहे. अवघ्या 17 वर्षांचा रियाज मुक्त विदयापीठातून शिक्षण घेत आहे. मंगळवारी (दि. 22) नेहमीप्रमाणे रियाज घरातील कामकाजामध्ये कुटुंबियांना मदत करत होता. याच वेळी घराच्या समोरील रस्त्यावरून एक वृद्ध दाम्पत्य टीव्हीएस लुना या दुचाकीवरून ओरडत येत असल्याचे त्याला दिसले. गाडीचे ब्रेक लागत नाहीत. आम्हाला वाचवा, अशी हाक ते जोडपे देत होते. हे रियाजच्या निदर्शनास आले. वेगात असणारी दुचाकी थांबवायची  कशी? असा विचार सुरुवातीला रियाजच्या मनात आला मात्र दुचाकीच्या मागे पळत रियाजने दुचाकीचे कॅरेज घट्ट धरले. दुचाकी थांबवली. रियाज च्या या प्रसंगावधानामुळे या वृद्ध  दाम्पत्य बचावले. 



 
ही दुचाकी थांबली नसती, तर ती थेट समोरील इंदापूर- बारामती राज्य महामार्गावर गेली असती. मात्र रियाजने दाखवलेल्या धाडसामुळे पुढील अनर्थ टळला. या प्रसंगातून बचावलेल्या वृद्ध दाम्पत्यानेदेखील 'बरे झाले लेकरा तू होतास म्हणून आम्ही वाचलो' अशा शब्दात रियाजचे आभार मानले. हा सर्व प्रकार येथील सीसीटीव्ही कॅमेरॅत कैद झाला असून रियाजच्या या धाडसाचे व प्रसंगावधानाचे सर्वत्र कौतुक होत आहे. ग्रामस्थांच्या वतीने रियाजचा सत्कार करण्यात आला.

मी घराच्या बाहेर साफसफाई करत होतो. एवढ्यात समोरून मला दुचाकीवरून वृद्ध जोडपे येताना दिसले. गाडीचे ब्रेक फेल झाले आहेत असे ते सांगत होते. मला त्या क्षणी जे सुचले ते मी केले. पळत जाऊन गाडीचे कॅरेज मागून घट्ट धरले. व गाडी थांबवली, अशी प्रतिक्रिया रियाजने दिली आहे.
 

Web Title: The young man saved the old couple and The brakes failed bike stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.