पेंडशेत येथील मंदिरातील मुकुटाची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:20 AM2021-02-13T04:20:36+5:302021-02-13T04:20:36+5:30

याबाबत येथील पोलीस ठाण्यातून पुजारी काळू तुकाराम वळे यांनी फिर्याद दाखल केली. पुजारी वळे हे शुक्रवारी पहाटे पाच वाजता ...

Theft of the crown from the temple at Pendshet | पेंडशेत येथील मंदिरातील मुकुटाची चोरी

पेंडशेत येथील मंदिरातील मुकुटाची चोरी

याबाबत येथील पोलीस ठाण्यातून पुजारी काळू तुकाराम वळे यांनी फिर्याद दाखल केली.

पुजारी वळे हे शुक्रवारी पहाटे पाच वाजता पूजेसाठी मंदिरात गेले. मंदिरातील गवळी बाबाची पूजा केली. त्यानंतर मंदिरातील चांदीपासून बनविण्यात आलेल्या खंडोबा, वाघोबा, शंकर आणि कळसुबाई यांची पूजा करून ते मंदिराच्या ओसरीवर ठेवले. त्यानंतर फेरी करण्यास गावात गेले. परत मंदिरात आरती पूजेसाठी आले असता ओसरीवर ठेवलेले चांदीचे देव तसेच गवळी बाबाचा २५० ग्रॅम वजनाचा मुकुट गायब झाल्याचे त्यांना दिसून आले. त्यांनी ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात आणून दिली.

यानंतर पुजारी वळे यांनी मंदिरात चोरी झाल्याची फिर्याद येथील पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सपोनि नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल बी. डी. आघाव करत आहे.

Web Title: Theft of the crown from the temple at Pendshet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.