श्रीगोद्यात मध्यरात्री चोरी, पोलीस पोहोचले सकाळी घटनास्थळी; निर्बंधांचा फटका; चोरट्याचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2021 11:42 AM2021-06-12T11:42:47+5:302021-06-12T11:43:20+5:30
श्रीगोंदा : श्रीगोंदा- पारगाव रोडवरील बोरुडे मळ्यात शुक्रवारी मध्यरात्री चोरी झाली. चोरट्यांनी राजेंद्र पांडुरंग बोरुडे यांच्या घराचे कुलुप तोडुन मोठा ऐवज लंपास केला आहे. चोरीत किती लाखाचे सोने व रोकड रक्कम किती गेली हे स्पष्ट झाले नव्हते.

चोरी झाल्याची माहिती समजताच शनिवारी सकाळी श्वास पथक, ठसे तज्ञ घटनास्थळी दाखल झाले.
पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांनी घटनास्थळास भेट दिली आणि तपासाची चक्रे फिरविली आहेत.
कोरोना लाॅकडाउनमुळे श्रीगोंदा तालुक्यात भुरट्या चोऱ्या चालू झाल्या. ही राजेंद्र बोरुडे यांची चोरी जवळपास राहणाऱ्या भामट्यांनी केली असा असा पोलिसांचा अंदाज आहे.