महावितरण कंपनीच्या रोहित्रातील १७० लीटर ऑईलची चोरी
By शेखर पानसरे | Published: November 29, 2023 03:12 PM2023-11-29T15:12:47+5:302023-11-29T15:12:58+5:30
या प्रकरणी घारगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
शेखर पानसरे, लोकमत न्यूज नेटवर्क, घारगाव: महावितरण कंपनीच्या रोहित्रातील १७० लीटर ऑईलची चोरी झाल्याचे समोर आले आहे. ही घटना संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील माळवाडी शिवारात रविवारी (दि. २६) रात्री १२.१५ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी घारगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
महावितरण कंपनीचे सहायक अभियंता मंगेश गांगुर्डे (मूळ रा. प्लॅट क्रमांक २०३, सी विंग, वर्धमान रेसिडेन्सी इंदिरानगर, नाशिक, हल्ली रा. कान्होरे बिल्डिंग, घारगाव, ता. संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. माळवाडी शिवारात कुऱ्हाडे वस्ती येथील रोहित्रातील ऑईलची रविवारी रात्री १२.१५ ते दुसऱ्या दिवशी दुपारी १५.३० वाजेच्या सुमारास चोरी झाली. चोरट्यांनी ८ हजार ५०० रुपयांचे १७० लीटर ऑईल चोरून नेल्याचे गांगुर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस हेड कॉस्टेबल रामभाऊ भुतांबरे अधिक तपास करीत आहेत.