नगर शहरात चोऱ्या वाढल्या, तपास रखडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:21 AM2020-12-31T04:21:05+5:302020-12-31T04:21:05+5:30
सराईत चोरट्यांचा बंदोबस्त करण्यात अपयश शहरातील तोफखाना, कोतवाली आणि भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत जबरी चोऱ्या, घरफोड्या आणि वाहन ...
सराईत चोरट्यांचा बंदोबस्त करण्यात अपयश
शहरातील तोफखाना, कोतवाली आणि भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत जबरी चोऱ्या, घरफोड्या आणि वाहन चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळ्या कार्यरत आहेत. या चोरट्यांचा बंदोबस्त करण्यात पोलिसांना अपयश येताना दिसून येत आहे.
नागरिकांवरच गस्त घालण्याची वेळ
गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील स्टेशन रोड, कल्याण रोड व केडगाव परिसरात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गस्तीला असलेल्या पोलिसांची नजर चुकवून चोरटे चोरी करीत आहेत. त्यामुळे केडगाव परिसरातील नागरिक रात्री एकत्र जमून गस्त घालताना दिसत आहेत.
वर्षभरात दाखल गुन्हे उघड दरोडा-५ ५
जबरी चोरी- ४९ २८
घरफोडी-७० १३
वाहन चोरी-१७९ ४४
इतर चोरी-१९४ ३४
-------------------------------------
नगर शहरातील चोरी, घरफोडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस ठाणे प्रभारींना सूचना देण्यात आलेल्या आहेत. इतर कामे आणि मनुष्यबळाची अडचण असतानाही प्रत्येक घटनेचा गांभीर्याने तपास केला जात आहे. सराईत टोळ्यांची गुन्हे करण्याची पद्धत लक्षात घेत
काही चोरीच्या घटनांचा तपास लावण्यात आलेला आहे. येणाऱ्या काळात चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी विशेष प्रयत्न केेले जातील- विशाल ढुमे, पोलीस उपाधीक्षक, नगर शहर विभाग.